Headlines

दिल्लीत उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर घणाघात:म्हणाले- रावण आणि तुमच्यात फरक काय? फडणवीसांच्या टीकेलाही दिले प्रत्युत्तर




नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. काल त्यांनी जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यानंतर आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत ठाकरेंनी केंद्र सरकारवर आणि भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. ‘सत्तेची हवा डोक्यात गेल्याने सरकार विद्यार्थ्यांशी संवाद साधत नाही,’ असा आरोप करत त्यांनी ‘तुमच्यात आणि रावणात फरक काय?’ असा सवाल सरकारला विचारला आहे. पहिल्या दिवसापासून आंदोलनाला पाठिंबा पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी काल अचानक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिलेले नाही, तर पहिल्या दिवसापासून माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे.” काल जंतरमंतर येथे जाऊन त्यांनी अभिजीत आणि इतर सर्व आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. “सरकारपेक्षा इंग्रज चांगले होते…” केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल करताना ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, “सध्या लोक म्हणू लागले आहेत की या सरकारपेक्षा इंग्रज चांगले होते. मोदी आणि शहांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे.” जर सरकारने या विषयावर विद्यार्थ्यांशी आधीच चर्चा केली असती, तर हे आंदोलन इतके पुढे गेले नसते, असा दावा त्यांनी केला. ‘मन की बात’वरून टोला आणि रावणाशी तुलना सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये संवादाचा अभाव असल्याच्या मुद्द्यावर ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला. “सरकार स्वतःची ‘मन की बात’ जनतेला बळजबरीने ऐकवते, पण लोकांनी मात्र आपली मन की बात सांगायची नाही, हे कसे चालेल? जर तुम्ही लोकांचे ऐकणार नसाल, तर रावण आणि तुमच्यात फरक काय राहिला?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. जर आपण लोकशाही मानतो, तर मग सरकार विद्यार्थ्यांशी चर्चा का करत नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला. “डोक्यात गेलेली हवा काढायला वेळ लागणार नाही…” उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेतून थेट केंद्राला इशारा दिला. “जे आज सत्तेत बसले आहेत, त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. पण ही हवा काढण्यासाठी जनतेला फार वेळ लागणार नाही,” असा इशारा ठाकरे यांनी दिली. इंदिरा गांधी आणि अण्णा हजारेंचा दिला दाखला सरकारने आंदोलकांशी संवाद न साधल्याबद्दल ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी जुने दाखले देत सरकारला सुनावले. “वांगचुक यांचे वडील उपोषणाला बसले होते, तेव्हा स्वतः इंदिरा गांधी त्यांना भेटल्या होत्या. तर अण्णा हजारेंना भेटायला तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख गेले होते. तुम्ही केवळ स्वतःचे म्हणणे लादत असाल आणि जनतेचे ऐकत नसाल, तर ही लोकशाही नाही,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे समर्थन अन् फडणवीसांना प्रत्युत्तर आंदोलक विद्यार्थ्यांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, “जर विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत असतील, तर त्यात चुकीचे काय आहे? तसेच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाला ‘फेसलेस’ आंदोलन म्हटले होते. यावरही ठाकरेंनी पत्रकार परिषदेत पलटवार केला. फडणवीसांच्या या वक्तव्याचा समाचार घेत, त्यांनी विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या लढ्याला बळ देण्याचे आवाहन केले आहे. हेही वाचा.. जंतरमंतरवर सलग तिसऱ्या रात्री हजारो आंदोलक:CJP च्या कार्यकर्त्यांची सुटका; दावा- मंत्री नड्डा, जितेंद्र सिंह वांगचुक यांना भेटले दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाचा आज ३३ वा दिवस आहे. मंगळवारी रात्री हजारो आंदोलक या ठिकाणी ठाण मांडून बसले होते; त्यांची तिथे ही सलग तिसरी रात्र होती. यामध्ये अशा व्यक्तींचाही समावेश होता ज्यांना २० जुलै रोजी झालेल्या ‘संसद मोर्चा’दरम्यान पोलिसांच्या लाठीमाराचा आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा सामना करावा लागला होता. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत