► वृत्तसंस्था नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान-समर्थित दहशतवादी शहबाज अन्सारीच्या आणखी एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडून एक सब-मशीन गन (एसएमजी) आणि तीन अत्याधुनिक शस्त्रे, तसेच 82 काडतुसे जप्त केली.
जप्त केलेली सब-मशीन गन झेकोस्लोव्हाकियामध्ये तयार करण्यात आली होती. हे शस्त्र नेपाळमार्गे पाकिस्तानमधून भारतात आणले गेले होते. अटक केलेला आरोपी सलीम पिस्तोल, याने ते पाकिस्तानमधून भारतात आणले होते. यापूर्वी या मॉड्यूलच्या सदस्यांकडून एक मशीन गन जप्त करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : Kangana Ranaut on Gen Z| “गटरछाप”…खासदार कंगना रणौत जंतर मंतरवरच्या जेनझींवर भडकल्या
6 जुलै रोजी, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका मोठ्या कारवाईत कुख्यात ‘शहजाद भट्टी नेटवर्क’च्या दोन वेगवेगळ्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी दिल्ली आणि पंजाबच्या विविध भागांत छापे टाकत सहा संशयितांना अटक केली होती. अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र, पिस्तूल आणि धोकादायक पेट्रोल बॉम्ब जप्त करण्यात आले होते.
दोन नेटवर्कद्वारे हल्ल्याचा कट
पोलिसांच्या मते, अटक केलेले आरोपी दोन अत्यंत धोकादायक आणि स्वतंत्र नेटवर्कद्वारे आपल्या कारवाया करत होते. पहिले मॉड्यूल थेट दहशतवादी कारवाया आणि राष्ट्रविरोधी कटांशी संबंधित होते. हे नेटवर्क एक मोठी अनुचित घटना घडवून आणण्याची योजना आखत होते. दुसरे मॉड्यूल केवळ अवैध शस्त्रांची तस्करी करणे आणि गुन्हेगार व गुंडांना शस्त्रs पुरवण्यात गुंतलेले होते.
