Deep Amavasya 2026 Shubhechcha in Marathi : आषाढ अमावस्येला साजरी केली जाणारी दीप अमावस्या हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा आणि श्रद्धेचा सण आहे. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवणाऱ्या या मंगलमय दिवसानिमित्त प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, कविता आणि शुभेच्छा येथे दिल्या आहेत. हे संदेश तुम्ही कुटुंबीय, मित्र आणि आप्तेष्टांना पाठवू शकता. तसेच WhatsApp Status, Facebook आणि Instagram वरही शेअर करू शकता.

घरातील प्रत्येक कोपरा प्रकाशाने उजळताना मनातही श्रद्धा आणि समाधानाची ज्योत प्रज्वलित होते. आपल्या पूर्वजांनी जपलेल्या या परंपरेत निसर्ग, अध्यात्म आणि कौटुंबिक संस्कार यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. म्हणूनच या मंगलमय दिवसाच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना प्रेम, आपुलकी आणि सकारात्मकतेने भरलेल्या शुभेच्छा देऊया. तुम्हीही या दीप अमावस्येच्या शुभेच्छा आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि आप्तेष्टांना पाठवू शकता. तसेच WhatsApp Status, Facebook आणि Instagram वर शेअर करून या पवित्र दिवसाचा आनंद सर्वांसोबत शेअर करू शकता.
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!!!
चंद्र-सूर्याचा तेजस्वी प्रकाशाने
उजळतील सर्व दिशा,
सुखाची नवी उमेद जागवेल
दर्श दीप अमावस्या
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आषाढ अमावस्येच्या शुभेच्छा
आयुष्यात तुमच्या उजळुदे
सुख समृद्धीचा दिवा
जीवनातील तुमच्या अंधकार
दीपपूजनाच्या दिनी दूर व्हावा
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा.
माझा नमस्कार सर्व देवांपाशी
तिळाचे तेल कापसाची वात |
दिवा जळो मध्यान्हरात |
दिवा लावला देवांपाशी |
उजेड पडला तुळशीपाशीं |
माझा नमस्कार सर्व देवांपाशी
दीप अमावस्येच्या सर्वांना शुभेच्छा…!
दर्श दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा
दिव्याच्या तेजस्वी प्रकाशाने
उजळतील दाही दिशा
सुखाची उमेद जागवेल
दर्श दीप अमावास्या
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!
दीप पुजनाच्या मंगलमय शुभेच्छा
दीवा अन् वातीचे नाते अनोखे
जन्मोजन्मी साथ देणारे,
अंधाराला दूर करूनी
जगाला प्रकाशाने उजळणारे
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या कुटुंबात सदा सौभाग्य अन् ऐश्वर्य नांदो!
दिव्याच्या मंगलमय प्रकाशाने,
तुमच्या कुटुंबात सदा सौभाग्य अन् ऐश्वर्य नांदो!
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!
‘शुभंकरोती कल्याणं’
दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन |
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा…!
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा
दिव्या दिव्या दिपत्कार
कानी कुंडल मोती हार
दीप अमावस्येच्या दिनी
सर्व देवतांना माझा नमस्कार
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचं नशीब दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघो
अंधारावर मात करणाऱ्या
या दिव्यांच्या सणाच्या दिवशी,
तुमच्या जीवनातील सर्व संकटे
दूर व्हावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
दीप अमावस्येच्या शुभेच्छा!
प्रेम आणि आपुलकीचे दीप सदा मनात तेवत ठेवू
ज्याप्रमाणे पणती स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देते,
तसेच प्रेम आणि आपुलकीचे दीप
आपण सर्वांच्या मनात तेवत ठेवूया
दीप अमावस्येच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमच्या घरावर ईश्वराची अखंड कृपा राहो
आषाढ अमावस्येच्या या शुभ दिनी
तुमच्या घरावर ईश्वराची अखंड कृपा राहो
आणि घरात सुख-शांतीचा वास असो
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
दीप अमावस्येच्या आणि आषाढ अमावस्येच्या शुभेच्छा
उजळू दे परिसर दिव्यांच्या तेजाने,
भरू दे घर सुख, शांती अन् समृद्धीने
दीप अमावस्येच्या आणि आषाढ अमावस्येच्या
तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
दीप पुजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती
यासारखी फुलत जावी आपली नाती!
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा
तमाकडून तेजाकडे नेणाऱ्या दीपत्काराला,
प्रकाशाच्या धारकाला दिव्यांच्या तेजोमय
चैतन्याला नमस्कार असो
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा
दीप अमावस्येच्या शुभेच्छा
आज दीप पूजा
सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार
नष्ट होऊन ज्ञान; आरोग्य; ऐश्वर्य;
शांती व सौख्याचा प्रकाश
जीवनात अविरत प्राप्त होवो
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा…!
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥
शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!!!
तुम्हा सर्वांना धन-संपत्ती अन् चांगले आरोग्य प्राप्त होवो
अहंकाराचा अंधार पळून जावो
दिव्याच्या तेजाने सद्वविचार वाढो
तुम्हा सर्वांना धन-संपत्ती अन् चांगले आरोग्य प्राप्त होवो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!

