Headlines

5 रुपयांत पालींना पाळवा पूनम देवनानी यांनी शेअर केला उपाय, एकदा हा उपाय करून पाहाच – how to get rid of lizards with help of onion


How To Get Rid Of Lizards : घरात पाल दिसली की अनेकांची घाबरगुंडी उडते. विशेषतः स्वयंपाकघर, बाथरूम, कपाटामागे किंवा पडद्यांच्या मागे पाल दिसली तर ती घरातून कशी दूर करायची, हा प्रश्न अनेकांना पडतो. पालीला न मारता घरापासून दूर ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय करून पाहता येतात. सोशल मीडियावर पूनम देवनानी यांनी पालींना घरापासून दूर ठेवण्यासाठी एक सोपी घरगुती ट्रिक शेअर केली आहे. या उपायासाठी घरात सहज उपलब्ध असलेल्या कांद्याचा आणि लसणाचा वापर केला जातो. यासोबतच एक घरगुती स्प्रे तयार करण्याची पद्धतही त्यांनी सांगितली आहे.

how to get rid of lizards naturally at home
फोटो सौजन्य :- @Maa, yeh kaise karun?, @iStock
घरात पाल दिसली की अनेकांची घाबरगुंडी उडते. विशेषतः स्वयंपाकघर, बाथरूम, कपाटामागे किंवा पडद्यांच्या मागे पाल दिसली तर ती घरातून कशी दूर करायची, हा प्रश्न अनेकांना पडतो. पालीला न मारता घरापासून दूर ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय करून पाहता येतात. सोशल मीडियावर पूनम देवनानी यांनी पालींना घरापासून दूर ठेवण्यासाठी एक सोपी घरगुती ट्रिक शेअर केली आहे. या उपायासाठी घरात सहज उपलब्ध असलेल्या कांद्याचा आणि लसणाचा वापर केला जातो. यासोबतच एक घरगुती स्प्रे तयार करण्याची पद्धतही त्यांनी सांगितली आहे.कांदा आणि लसणाच्या तीव्र वासामुळे पाल त्या ठिकाणी येणे टाळते, असा दावा या घरगुती उपायामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पाल ज्या ठिकाणी वारंवार दिसते, त्या जागी हा उपाय करून पाहता येतो. यासाठी वेगळ्या महागड्या वस्तू आणण्याची गरज नसून, घरातील स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर केला जातो. त्यामुळे कमी खर्चात हा उपाय करून पाहता येऊ शकतो.(फोटो सौजन्य :- @Maa, yeh kaise karun?, @iStock)

कांद्याच्या वासाने पाल दूर राहते?

कांद्याच्या वासाने पाल दूर राहते?

पूनम देवनानी यांच्या सांगण्यानुसार, कांद्याचा तीव्र वास पालींना आवडत नाही. त्यामुळे कांद्याचा वास असलेला छोटा उपाय पाल ज्या भागातून घरात येते किंवा ज्या ठिकाणी ती वारंवार दिसते, तिथे ठेवता येतो. यासाठी कांदा घेऊन त्याचा वरचा भाग काढल्यानंतर उरलेला भाग वापरता येतो. कांद्याचा छोटा तुकडा धाग्याला बांधून स्वयंपाकघराच्या आसपास किंवा पाल येते असे वाटत असलेल्या ठिकाणी टांगून ठेवण्याची पद्धत व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे.

कांदा आणि लसूण वापरून स्प्रे

कांदा आणि लसूण वापरून स्प्रे

दुसरा उपाय म्हणून कांदा आणि लसूण यांचा वापर करून स्प्रे तयार करण्याची पद्धत सांगण्यात आली आहे.सुरुवातीला एक कांदा घ्यावा आणि त्याचे छोटे-छोटे तुकडे करावेत. त्यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या घालाव्यात. हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात थोडे पाणी घालावे. त्यानंतर कांदा आणि लसूण बारीक वाटून घ्यावे.तयार झालेली पेस्ट गाळून त्याचा रस वेगळा करून घ्यावा. या रसाचा वापर पुढे स्प्रे तयार करण्यासाठी केला जातो.

घरातून पाल पळवण्याचा घरगुती उपाय

स्प्रेमध्ये कोणते पदार्थ घालायचे?

स्प्रेमध्ये कोणते पदार्थ घालायचे?

कांदा आणि लसणाच्या रसामध्ये व्हिडिओमध्ये साबण, तसेच लवंग आणि काळी मिरी वापरण्याचे सांगितले आहे. लवंग आणि काळी मिरी बारीक करून या मिश्रणात घालण्यात येते.कांदा, लसूण, लवंग आणि काळी मिरी यांच्या तीव्र वासामुळे तयार होणारे हे मिश्रण पाल त्या जागेपासून दूर ठेवण्यास मदत करेल, असा या घरगुती उपायामागील दावा आहे.मिश्रण तयार झाल्यानंतर ते स्प्रेच्या बाटलीमध्ये भरून आवश्यक त्या ठिकाणी फवारता येते.

स्प्रे कुठे करावा?

स्प्रे कुठे करावा?

पाल वारंवार ज्या ठिकाणी दिसते, त्या भागात हा स्प्रे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, शू-रॅकच्या मागे, कपाटाच्या आसपास, पडद्यांच्या मागे, स्वयंपाकघरातील कोपऱ्यांमध्ये किंवा पाल घरात प्रवेश करते असे वाटणाऱ्या जागांजवळ याचा वापर केला जाऊ शकतो.तसेच घरातील अंधारे आणि कमी वापरले जाणारे कोपरे नियमित स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे.

पाल घरात येऊ नये यासाठी काय कराल?

पाल घरात येऊ नये यासाठी काय कराल?

फक्त घरगुती स्प्रेवर अवलंबून राहण्यापेक्षा पाल घरात येण्याची कारणे कमी करणे अधिक चांगले ठरू शकते. पाल प्रामुख्याने कीटकांच्या शोधात घरात येते. त्यामुळे घरातील मुंग्या, माश्या, डास आणि इतर छोटे कीटक कमी करण्याचा प्रयत्न करावा.खिडक्या आणि दरवाज्यांजवळील फटी बंद कराव्यात. भिंतीतील छोटी छिद्रे असल्यास ती बुजवावीत. स्वयंपाकघरातील अन्नाचे कण आणि कचरा लगेच साफ करावा. रात्री अनावश्यकपणे खिडक्यांजवळ दिवे लावणे टाळल्यास कीटकांची वर्दळ कमी होण्यास मदत होऊ शकते.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा