Dada Kondke Death : दादा कोंडके यांनी अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांच्या अकाली निधनानं सर्वांनाच धक्का बसलेला. दादा कोंडके यांच्या मृत्यूचा प्रसंगही अंगावर काटा आणणारा आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सुप्रसिद्ध मराठी अभिनेते दादा कोंडके यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं असून आजही चाहते त्यांचे सिनेमे आवर्जून बघतात. दादा कोंडके त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असायचे. त्यांच्या मृत्यूचा प्रसंगही अंगावर काटा आणणारा आहे. एका मुलाखतीमध्ये मराठी लेखिका अनिता पाध्ये यांनी दादा कोंडके यांच्या मृत्यूचा प्रसंग सांगितलेला.
दादा कोंडके यांच्या मृत्यूचा प्रसंग
दादा कोंडके यांचं १४ मार्च १९९८ रोजी निधन झालं. एकदा रात्री अचानक दादा कोंडके यांची प्रकृती खालावली आणि त्यांना सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यासोबत जे लोक काम करायचे तेच त्यांच्यासोबत रहायचे. हा प्रसंग सांगताना अनिता पाध्ये म्हणाल्या की, ‘दादांचं अचानक निधन झालं. रात्री पाऊणे तीन वाजता त्यांचे मॅनेजर जीतू भाई यांचा मला फोन आला. ते मला म्हणाले की, दादांची प्रकृती बिघडली आहे. आम्ही त्यांना सश्रृषाच्या हॉस्पिटलमघ्ये घेऊन जातोय. तुम्ही याल का? मी येते म्हणून सांगितलं. दादांसोबत फक्त त्यांच्यासोबत काम करणारे चार जण राहायचे.’
Tanya Puri : ‘विवाहित असूनही निम्म्या वयाच्या मुलींसोबत संबंध ठेवतो’, डिटेक्टिव्हनं केली बॉलिवूड अभिनेत्याची पोलखोल ‘मी माझ्या भावाला सांगितलं की, तू दादांच्या नातेवाईकांना फोन कर. त्यांची बहिण पुन्हाला राहायची. दादांना ॲम्ब्युलन्सने घेऊन जायचं होतं. त्या काळात जास्त ॲम्ब्युलन्स नव्हत्या. हॉस्पिटलमध्ये दारातच ॲम्ब्युलन्स होती. पण, त्यांनी सांगितलं की, तुम्हाला फॉर्म भरावा लागेल, पण ते रजिस्टर लॉकरमध्ये आहे आणि आता ड्रायव्हर नाहीये. एक शिवसेनेची ॲम्ब्युलन्स होती, पण ती मिळाली नाही. नंतर मी विजय कोंडके यांना फोन केला. शेवटच्या काळात विजय यांच्यासोबत दादा कोंडके यांचे संबंध चांगले नव्हते. तरीही मी त्यांना फोन केला आणि दादांबद्दल सांगितलं. दादांच्या दोन जवळच्या मित्रांना कळवलं. त्यावेळचे कामगार मंत्री साबीर शेख यांना फोन केला पण ते बाहेर होते. दोन तास हॉस्पिटलमध्ये दादांच्या प्रेताजवळ मी एकटीच होते.’
Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा
‘तेव्हा ॲम्ब्युलन्स मिळाली नाही. त्यामुळे मी आणि दादांचे दोन मित्र दादांच्याच कॉन्टेसा गाडीतून त्यांचं प्रेत घेऊन आलो. बालमोहनच्या गल्लीत एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर दादा राहायचे. आम्ही दुसऱ्या मजल्यावर प्रेत घेऊन गेलो आणि संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादांचे नातेवाईक, राजकारणी नेते अंत्यसंस्काराला आलेले. बाळासाहेब ठाकरेसुद्धा आलेले. ते दादांच्या प्रेताजवळ बसून त्यांच्या कपाळावरून हात फिरवत होते.’ असं अनिता यांनी शेवटी सांगितलं.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा