CSMT Goregaon Harbour line Mumbai Local to remain closed for 45 days Western Railway 6th lane Bandra gets new Platform; CSMT-गोरेगाव हार्बर लोकल दीड महिने बंद राहण्याचे संकेत, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेचं काम, वांद्य्रात नवा फलाट
CSMT Goregaon Harbour line Mumbai Local to remain closed for 45 days Western Railway 6th lane Bandra gets new Platform; CSMT-गोरेगाव हार्बर लोकल दीड महिने बंद राहण्याचे संकेत, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेचं काम, वांद्य्रात नवा फलाट
Mumbai Local : मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गाच्या उभारणीसाठी हार्बर रेल्वेवरील गोरेगावपर्यंतची लोकल सेवा सुमारे ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गाच्या उभारणीसाठी वांद्रे-खार उड्डाणपुलाची पुनर्बांधणी अत्यावश्यक आहे. या कामासाठी हार्बर गोरेगावपर्यंतची लोकल सेवा सुमारे ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. या प्रकल्पादरम्यान वांद्रे स्थानकात एक नवा फलाट उभारण्यात येणार आहे.
मुंबई सेंट्रल-बोरीवलीमध्ये सहावी मार्गिका
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-२ प्रकल्पांतर्गत मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान ३० किलोमीटरची सहावी मार्गिका उभारण्यात येत आहे. सद्यस्थितीत खार ते बोरिवलीदरम्यान ही मार्गिका सुरू आहे. मुंबई सेंट्रल ते खारदरम्यान मार्गिका उभारण्याचे काम सुरू आहे. वांद्रे-खार उड्डाणपूल पाडून त्याची पुनर्बांधणी करणे हे प्रकल्पातील सर्वांत महत्त्वाचे आव्हान आहे.
वांद्रे स्थानकातील प्रस्तावित नव्या फलाटावरून अधिक लोकल फेऱ्या चालवणे शक्य होणार आहे. या सहाव्या मार्गाच्या उभारणीची प्रमुख निविदा प्रक्रिया ऑगस्ट २०२६पासून टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे.
Farm Loan Waiver Problems: यादीत नाव नाही, रक्कम कमी, Farmer ID Issues, मयत शेतकऱ्यांना लाभ कसा?
ठाणे स्थानकातील खाद्यपदार्थांवर उंदीर
दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानकातील एका स्टॉलमधील खाद्यपदार्थांवर उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ बुधवारी रात्री समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली. संबंधित स्टॉल सात दिवसांसाठी सील करण्यात आला. कंत्राटदाराला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या कारवाईनंतर सर्व रेल्वे स्थानकांवरील स्टॉलची तपासणी करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. E20 Fuel in India : ई20 पेट्रोल वाहनांसाठी सुरक्षित, राज्यमंत्र्यांचे लोकसभेत उत्तर, वाहन बंद पडण्याचे व्यापक पुरावे नाहीत ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर प्रतीक्षालय आहे. या प्रतीक्षालयात बहुउद्देशीय स्टॉल आहे. यामधील टोमॅटोवर उंदीर फिरत असल्याचे दिसले. एका प्रवाशाने ही घटना मोबाइल फोनमध्ये टिपली. व्हिडीओ व्हायरल झाला. त्याची दखल घेत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील वाणिज्य कार्यालयाने खातरजमा केली. त्यानंतर स्टॉलधारकाविरुद्ध कारवाई करत स्टॉल सात दिवसांसाठी सील केला. कंत्राटदाराला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा