Crude Oil : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत जमिनीवर कोसळल्या आहेत. जागतिक व्यापाराची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा तेलाचा पुरवठा सामान्य राहिल्यामुळे क्रूडच्या किमतीत जोरदार आपटी बॉम्ब फुटला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलाचा पुरवठा सुरळीत होण्यासोबतच ओपेक+ देशांनी तेलाच्या उत्पादनाबाबत घेतलेल्या निर्णयाचा क्रूडच्या दरांवर परिणाम दिसून आला.

आदल्या दिवशी, रविवारी, जागतिक व्यापारासाठी महत्त्वाच्या अशा होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल आणि गॅस वाहून नेणाऱ्या जहाजांची वाहतूक पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीने होताना दिसून आली, तर याआधी सुरक्षेच्या कारणास्तव काही जहाजांनी अचानक आपले मार्ग बदललेले, पण आता परिस्थिती पुन्हा सामान्य होताना दिसत आहे. यामुळे बाजाराला दिलासा मिळाला आणि क्रूडच्या किंमतीवरील दबाव कमी झाला.
Jainam Jain: बेबी बॉस! 14 व्या वर्षी कंपनी सुरू, बुर्ज खलिफात ऑफिस; जैनमचा कारनामा पाहून भलेभले थक्क
ओपेक+ च्या निर्णयाचा कच्च्या तेलावर परिणाम
त्याचप्रमाणे, 21 देशांच्या ओपेक+ समूहाने पुढील महिन्यापासून तेलाचे उत्पाद आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला. सौदी अरेबिया आणि रशिया या दोन प्रमुख देशांच्या नेतृत्वाखाली 7 देशांनी दररोज अतिरिक्त 1.88 लाख बॅरल उत्पादनास मंजुरी दिली असून भविष्यात बाजारात अधिक तेल उपलब्ध करून देण्याचा ओपेकचा इरादा यावरून स्पष्ट होतो.
Property Rights: नातेवाईक, भाऊ-बहीण जमीन वाटपास तयार नाही; खरच संमतीशिवाय जमिनीतला हिस्सा तुम्हाला मिळतो का?
अशा परिस्थितीत, पुरवठा सुरळीत सुरू राहिल्यास कच्च्या तेलाच्या किमती आणखी खाली येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जगभर कच्च्या तेलाचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय होत राहिल्यास या वर्षाच्या अखेरपर्यंत तेलाच्या किमती प्रति बॅरल 60 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात, असा काही प्रमुख आंतरराष्ट्रीय बँकांचा अंदाज आहे.
मल्टीबॅगर स्टॉकचा जलवा! चंचल बाजारात 1 लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांना मिळाले 5.5 लाख; 6 महिन्यात दिला बंपर रिटर्न
त्याचवेळी, सौदी अरेबियानेही आपली तेल निर्यात वाढवली असून टँकर आता होर्मुझ सामुद्रधुनीतून सहज प्रवास करत आहेत. तसेच संयुक्त अरब अमिरातीनेही तेलाचा सामान्य पुरवठा पूर्ववत केला आहे. दुसरीकडे, सौदी अरेबियाने आशियाई देशांना विकल्या जाणाऱ्या आपल्या प्रमुख क्रूडवरील प्रीमियम जुलै महिन्यासाठी प्रति बॅरल 15.50 डॉलरवरून 9.50 डॉलरपर्यंत आधीच कमी केला आहे. यावरून उत्पादक देश अधिक तेल विकून आपला बाजारहिस्सा वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते.

