Headlines

Crude Oil Price Today 29 June 2026; होर्मुझची सामुद्रधुनी पेटली, इराण-अमेरिका पुन्हा भिडले; तेलाच्या किमतीत अचानक खळबळ, आता पुन्हा महागाईची भडका!


Crude Oil Prices 29 June 2026: मागील काही दिवसांपासून क्रूडच्या किमती घसरणपंथीला आल्या होत्या, पण गेल्या दोन-तीन दिवसांच्या हालचालींमुळे कच्च्या तेलाच्या दरांना पुन्हा एकदा उकळी आल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकी आणि इराणने वीकेंडला एकमेकांवर हल्ला केला ज्यामुळे पश्चिम आशियातील तणाव पुन्हा वाढला असून होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद होण्याचा धोका वाढला परिणामी, तेल बाजारात घबराट पसरली.

Crude Oil Price Hike on Fresh US-Iran Strikes on Hormuz Strait
अमेरिका-इराण हल्ल्यामुळे कच्च्या तेलाला उकळी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Iran-US War: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाने जागतिक कमोडिटी बाजारात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली असून आंतरराष्ट्रीय तेल बाजाराला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिका आणि इराण यांनी गेल्या दोन दिवसांत नव्याने लष्करी हल्ले सुरू केले ज्यामुळे पश्चिम आशियातून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय येण्याच्या शक्यतेबाबत चिंता पुन्हा निर्माण झाल्याने परिणामी, सोमवारी तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली.

अमेरिका-इराण हल्ल्यामुळे कच्च्या तेलाला उकळी

सोमवारी सकाळी इराण संघर्ष सुरू होण्याच्या एक दिवस आधी, 27 फेब्रुवारीनंतर शुक्रवारी प्रथमच 70 डॉलरखाली घसरल्यानंतर, अमेरिकेचा बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट – WTI – कच्च्या तेलाचा वायदा 0.71% वाढून प्रति बॅरल 69.72 डॉलरवर पोहोचला. यादरम्यान, ब्रेंट क्रूडचा वायदा 0.36% वाढून प्रति बॅरल 72.25 डॉलरवर पोहोचला.
Maharashtra TimesLPG Cylinder New Rule : 1 जुलैपासून नियम बदलणार, या ग्राहकांचे एलपीजी कनेक्शन थेट बंद होणार
गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका-इराण यांनी परस्पर हल्ले केल्यानंतर पश्चिम आशियातील तात्पुरत्या शांतता कराराच्या अस्थिरतेबाबत गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली. तसेच स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील जहाज वाहतूक मंदावली असून या कारणांमुळे सोमवारी तेलाच्या किमतीत किंचित वाढ नोंदवली गेली.

कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याचे कारण काय

होर्मुझमधील व्यापारी जहाजांवर इराणच्या अलीकडील हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात अमेरिकेने इराणी लष्करी तळांवर हल्ले केल्यानंतर पश्चिम आशियातील संघर्ष सोडवण्यासाठी सुरू असलेली चर्चा स्थगित केल्याचे वृत्त समोर आले ज्यामुळे तेल बाजाराची चिंता वाढली.
Maharashtra TimesGold Silver Rate Crash: सराफा बाजारात घबराट… पिवळसर सोने 17000 रुपये, चांदीची किंमत 51000 रुपयांनी उतरली; भाव कमी होण्याची काय आहेत कारणे?
तब्बल 20 लाख बॅरल तेल वाहून नेताना ज्या Kiku, महाकाय जहाजावर – VLCC – हल्ला झाला, ते जहाज अखेरचे ओमानच्या आखातातील UAE मधील फुजैराह बंदराजवळ दिसून आले. या अलीकडच्या हालचालींमुळे होर्मुझची सामुद्रधुनी मार्गे होणारी तेल आणि नैसर्गिक गॅसची वाहतूकही मंदावली परिणामी, तात्पुरत्या करारानंतर वाहतुकीत झालेली वाढ पुन्हा कमी होण्याचा धोकाही निर्माण झाला.
Maharashtra TimesDelayed Possession: घराचा ताबा दिला म्हणजे ग्राहकांचे अधिकार संपले का? बिल्डर लॉबीला सुप्रीम कोर्टाने सुनावलं! नक्की काय घडलं

अमेरिका-इराण तणावाला ब्रेक

मात्र, त्याचप्रमाणे वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणने युद्धविरामास सहमती दर्शवून हल्ले थांबवण्यावर सहमती दर्शवली. याशिवाय स्ट्रेट ऑफ होर्मुझसंदर्भातील वाद निवळण्याच्या उद्देशाने दोन्ही देश कतारमधील दोहा येथे पुन्हा चर्चा करण्यास तयार झाले आहेत.
Maharashtra Timesनव्या आयकर प्रणालीत मिळतात 5 टॅक्स बेनिफिट; तुम्ही वाचवू शकता कर, ITR भरण्यापूर्वी जाणून घ्या कसा आणि कुठे
गेल्या आठवड्याच्या शेवटी चाललेल्या लष्करी कारवाया आणि प्रति-हल्ल्यांनंतर दोघे जहाजांची ये-जा सुरळीत करण्याच्या उद्देशाने हल्ले थांबवणार आहेत. सागरी मार्ग आणि बंदरांच्या वापराबाबत अलीकडेच झालेल्या सामंजस्य कराराच्या अर्थाबाबतचे मतभेद दूर करण्याचा दोहा येथे होणाऱ्या चर्चेमागचा मुख्य उद्देश आहे.

इराणने व्यापारी जहाजांवर हल्ला करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा अमेरिकेने आरोप करून इराणच्या लष्करी लक्ष्यांवर हल्ले केले आणि प्रत्युत्तरात इराणने बहरीन आणि कुवेत येथील अमेरिकेच्या लष्करी तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे व ड्रोन डागले, तर तणाव आणखी वाढवण्याबाबत एकमेकांना नवीन इशारे दिले.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा