Headlines

EPFO Pension Calculation; 15 वर्षे प्रायव्हेट नोकरी, 10,000 ते 15,000 सॅलरीवर इतकी मिळेल पेन्शन, या फॉर्म्यूल्याने करा कॅलक्युलेट


Pension News: तुम्ही एखाद्या प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत असाल, तर रिटायरमेंटनंतर तुमच्या मासिक पेन्शनचे कॅलक्युलेशन कसे होते याबद्दल माहिती असली पाहिजे जेणेकरून भविष्यात तुमचा गोंधळ उडू नये. बहुतेक कर्मचाऱ्यांना वाटतं की आपली पेन्शन आपल्या शेवटच्या पगारावर अवलंबून असते, पण EPFO ​​चे नियम काही वेगळंच चित्र दर्शवतात.

किमान 15 वर्षांच्या सेवेच्या अनिवार्य आवश्यकतेपासून ते 15000 रुपयांच्या पगाराच्या कमाल मर्यादेपर्यंत, असे अनेक घटक आहेत ज्यांचा तुमच्या पेन्शनवर प्रभाव पडतो. अशाप्रकारे, EPFO नियमांनुसार, तुमची पेन्शन प्रामुख्याने दोन घटकांवर अवलंबून असते: पेन्शनपात्र वेतन आणि पेन्शनपात्र सेवा. 10,000 ते 15,000 पर्यंत पेन्शनपात्र पगारासह 15 वर्षांच्या सेवेनंतर तुम्हाला दरमहा किती पेन्शन मिळेल, याचे कॅलक्युलेशन समजून घेऊया.

Maharashtra Times8th Pay Commission लागू व्हायला 2027 पर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार; केव्हा वाढीव पगार मिळणार? सरकारने संसदेत दिली माहिती

पेन्शनसाठी सर्वात महत्त्वाची अट

निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन मिळवण्याची सर्वात पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे की तुम्ही किमान 10 वर्षांची निवृत्तीवेतनपात्र नोकरी पूर्ण केली पाहिजे. एखाद्या कर्मचाऱ्याने 10 वर्ष नोकरीचा कालावधी पूर्ण होण्याआधीच नोकरी सोडली आणि निधी काढला, तर त्याला सेवानिवृत्तीनंतर मासिक निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही.

जितका जास्त कालावधी तितकीच जास्त पेन्शन

तुमच्या नोकरीचा कालावधी जितका जास्त असेल तितके जास्त निवृत्तीवेतन तुम्हाला मिळेल. EPS नियमांनुसार एखाद्या कर्मचाऱ्याने 20 वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केली, तर निवृत्तीवेतनाची गणना करताना सेवा कालावधीत दोन अतिरिक्त वर्षे जोडली जातात.

Maharashtra TimesN Chandrasekaran Successor: टाटा समूहात नव्या ‘चंद्रा’चा शोध, उत्तराधिकारीबाबत चिंता; टाटा सन्सच्या नवीन बॉसच्या शर्यतीत कोण-कोण?
पेन्शनचे सूत्र कसे काम करते?

एखाद्या कर्मचाऱ्याने 15 वर्षे नोकरी केली असेल तर, वेगवेगळ्या निवृत्तीवेतनपात्र पगारानुसार मासिक निवृत्तीवेतनाची रक्कम खालीलप्रमाणे आहे-

समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा निवृत्तीवेतनपात्र पगार 10,000 रुपये असेल आणि 15 वर्षे नोकरी केल्यावर पेन्शनचे कॅलक्युलेशन (10,000 × 15) ÷ 70 म्हणजे 2,142.85 रुपये होईल, म्हणजेच दरमहिन्याला सुमारे 2,143 रुपये निवृत्तीवेतन मिळेल.

त्याचवेळी, उच्च पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कमाल निश्चित वेतन मर्यादा 15000 रुपये आहे. अशाप्रकारे, पेन्शन सूत्रानुसार म्हणून, या आकड्यावर अंतिम कॅलक्युलेशन केल्यास (15000 × 15) ÷ 70, म्हणजेच 2,25,000 ÷ 70 केल्यास एकूण मासिक पेन्शन सुमारे 3,214.28 रुपये, म्हणजेच अंदाजे 3,214 रुपये येते.

Maharashtra TimesMega Deal: मुकेश अंबानींनी अमेरिकेसोबत केली मोठी डील; 18,268 कोटींची गुंतवणूक भारतात येणार, BofA शी हातमिळवणी

15 वर्षांच्या सेवेनंतर पेन्शनची गणना

पेन्शनसाठी पात्र पगार (सरासरी पगार) नोकरीची वर्षे गणना मासिक निवृत्तीवेतन (अंदाजे)
10,000 रुपये 15 वर्षे (10,000 × 15) / 70 2,143 रुपये
11,000 रुपये 15 वर्षे (11,000 × 15) / 70 2,357 रुपये
12,000 रुपये 15 वर्षे (12,000 × 15) / 70 2,571 रुपये
13,000 रुपये 15 वर्षे (13,000 × 15) / 70 2,786 रुपये
14,000 रुपये 15 वर्षे (14,000 × 15) / 70 3,000 रुपये
15,000 रुपये (कमाल मर्यादा) 15 वर्षे (15,000 × 15) / 70 3,214 रुपये