Headlines

Crude Oil Price 20 July 2026; धोक्याची घंटा! तेलाच्या किमती पेटल्या; पेट्रोलपासून किराणा वस्तूपर्यंत सगळं महागणार? जगाची तेलकोंडी होण्याची चिंता वाढली


Oil Prices Today: इराण आणि अमेरिकेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून या परिस्थितीचा थेट परिणाम तेलाच्या बाजारावर होत आहे. युद्धविराम मोडल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली, ज्याचा जागतिक तेल पुरवठ्यावर नकारात्मक परिणाम होण्याच्या चिंतेमुळे सोमवारी, नवीन व्यापार सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी, ब्रेंट क्रूडच्या किमती 90 डॉलर पार उसळली.

याआधी मध्यपूर्वेतील युद्धाला युद्धविराम लागल्यावर क्रूडची किंमत 71 डॉलर बॅरलपर्यंत कमी झालेली पण, आता अलीकडच्या हालचालींनंतर कच्च्या तेलाच्या किमतीतील या दैनंदिन वाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

Maharashtra TimesEconomic Growth: अर्थव्यवस्थेवर मंदीची सावली, अख्खं जग संकटात जाण्याची शक्यता; भारतालाही परिणाम भोगावे लागणार, युद्धाबाबत Moody’s चा इशारा

कच्च्या तेलाचा आजचा दर काय

ब्रेंट क्रूडचा दर 2.70 टक्क्यांनी वाढून 90.52 डॉलर बॅरलवर उसळला तर, अमेरिकी क्रूड – WTI – 2.27 टक्क्यांनी वाढला आणि 84.37 डॉलर बॅरलवर पोहोचला असून गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला 72 डॉलरवर होता. यादरम्यान, सध्या आखाती देशात नजीकच्या काळात शांतता होताना दिसत नसून अमेरिकेच्या प्रचंड लष्करी तयारी पाहून युद्ध आणखी काही काळ लांबेल अशी गुंतवणूकदारांना भीती लागली आहे, ज्यामुळे कोणताही धोका टाळण्यासाठी तेल व्यापाऱ्यांना कच्च्या तेलाची जास्त किमतीत खरेदी करणे भाग पडत आहे.

Maharashtra TimesSEBI New Rule: सेबीने बदलले म्युच्युअल फंडचे नियम, गुंतवणूकदारांना कसा मिळेल फायदा? व्यक्तीच्या मृत्यूनंतर पैसे काढण्याची प्रोसेस बदलली

इराण युद्धात अमेरिकी सैनिकांचा बळी

इराणविरुद्ध अमेरिकी लष्कराच्या लष्करी कारवाईत तिसरा अमेरिकी सैनिक ठार झाल्याची पुष्टी केली गेली. जॉर्डनमधील इराणी हल्ल्याच्या घटनास्थळाजवळ तपासकर्त्यांना अवशेषही सापडले, तर याआधी याच हल्ल्यात 2 अमेरिकी सैनिक ठार झाले आणि एक बेपत्ता होता.

अशा परिस्थितीत, पश्चिम आशियामधील परिस्थती जोपर्यंत निवळत नाही आणि होर्मुझ सुरक्षित होत नाही तोपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता नाही, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिली आणि अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष दीर्घकाळ चालू राहिले तर कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात.

Maharashtra TimesProperty Rights: पतीने आईच्या नावावर केलेली मालमत्ता खरंच घटस्फोटित पत्नीला मिळत नाही? परिस्थितीत हिस्सा मिळू शकतो समजून घ्या

अमेरिकेचा नवव्या रात्री इराणवर हल्ला सुरूच

अमेरिकेच्या लष्कराने सलग नवव्या रात्री इराणी लक्ष्यांवर हल्ले केले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने X रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार या हल्ल्यांमुळे इराणची लष्करी क्षमता कमजोर होत राहील, ज्याचा वापर होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाज आणि खलाशांवर हल्ला करण्यासाठी केला जातो.

अमेरिकी सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार अलीकडच्या हल्ल्यांमध्ये इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली, सागरी लष्करी मालमत्ता, क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठवणूक केंद्रे, तसेच जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी जवानांवर 17 जुलै रोजी झालेल्या हल्ल्याशी संबंधित IRGC च्या तुकड्यांना लक्ष्य केले गेले.

Maharashtra TimesDMart New Business Strategy: झेप्टो, ब्लिंकिटमुळे स्वस्ताई काम करेना! डिमार्टची नवीन शक्कल बदलणार का डिलिव्हरी ॲपचा गेम

भारतात पेट्रोल-डिझेलची महागाई वाढण्याची भीती

दुसरीकडे, क्रूडच्या दरवाढीमुळे भारतात सरकार आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणखी वाढवणे भाग पडू शकते. यामुळे वाहतूक खर्चापासून ते कंपन्यांच्या उत्पादन खर्चापर्यंत सर्वच गोष्टींचा खर्च वाढेल. त्याचप्रमाणे, क्रूडच्या किमती दीर्घकाळ उच्च राहिल्यास जागतिक चलनवाढीवर नियंत्रण ठेवणे आणखी कठीण होऊन बसेल. महागणाऱ्या वाहतूक खर्चामुळे अन्न आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढतील, ज्याला आळा घालण्यासाठी बँकांना व्याजदर वाढवणे भाग पडेल परिणामी सर्वसामान्यांच्या खिशावरील बोजा वाढेल.