Brutal murder case of wife and child in nashik husband admitted in hospital; आधी पत्नी आणि मुलाला संपवलं, नंतर पतीचाही जीव देण्याचा प्रयत्न; नाशिकमधील घटनेनं खळबळ
Brutal murder case of wife and child in nashik husband admitted in hospital; आधी पत्नी आणि मुलाला संपवलं, नंतर पतीचाही जीव देण्याचा प्रयत्न; नाशिकमधील घटनेनं खळबळ
Nashik Crime: बायको आणि मुलाचा खून करून नंतर पतीनेही जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.
आधी पत्नी आणि मुलाला संपवलं, नंतर पतीचाही जीव देण्याचा प्रयत्न; नाशिकमधील घटनेनं खळबळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक: नाशिक शहरातील जेलरोड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. जेलरोड इथं पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या करत स्वतःही विषारी औषध प्राशन करून एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेलरोड येथील महारुद्र कॉलनी येथे आज घडलेल्या घटनेने परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी हजारे आणि श्रेयश हजारे असं या घटनेत हत्या झालेल्यांची नावे आहेत. घटनेची माहिती नाशिक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि नाशिक रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
पोलीस महारुद्र कॉलनी येथील हजारे यांच्या घरी पोहोचताच किरण हजारे हा जखमी अवस्थेत आढळून आला. या घटनेतील आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयित किरण याला तत्काळ प्राथमिक उपचासाठी बिटको रुग्णालय आणि त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे अत्यंत निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली आहे. अश्विनी यांच्या डोक्याला मागील बाजूस धारदार हत्याराने वार करत आणि सात वर्षीय श्रेयश याच्या गळ्यावर वार करत हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.
दरम्यान, अश्विनी हजारे हिचा किरण याच्याशी २०१७ मध्ये दुसरा विवाह झाला होता. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. किरण हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्याबरोबरच सोलर प्लांट उभारणीचा व्यवसाय करत होता. मात्र त्याने अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले, याचं कारण अद्यापही अस्पष्ट असून घटनेचा अधिक तपास नाशिक रोड पोलीस करत आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा