Congress leader rajeev satav wife pradnya satav likely to join bjp set back for mahavikas aghadi; महाराष्ट्र काँग्रेसमध्ये महाभूकंप? राहुल गांधींच्या सर्वांत निकटवर्तीय नेत्याची पत्नी भाजपमध्ये जाण्याची शक्यता
Congress leader rajeev satav wife pradnya satav likely to join bjp set back for mahavikas aghadi; महाराष्ट्र काँग्रेसमध्ये महाभूकंप? राहुल गांधींच्या सर्वांत निकटवर्तीय नेत्याची पत्नी भाजपमध्ये जाण्याची शक्यता
Maharashtra Congress: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीला सतत हादरे बसत असून काँग्रेसला आता पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेतील विद्यमान आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
राहुल गांधींच्या सर्वांत निकटवर्तीय नेत्याची पत्नी भाजपमध्ये जाण्याची शक्यता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हिंगोली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहाणीकारक पराभवानंतर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना गळती लागली असून काँग्रेसला सर्वाधिक धक्के बसत आहे. माजी आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, कुणाल पाटील हे भाजपवासी झाल्यानंतर आता काँग्रेसचे माजी खासदार दिवगंत राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या विधानपरिषद आमदार प्रज्ञा सातव यादेखील काँग्रेसचा हात सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रज्ञा सातव यांचा उद्या भाजप प्रवेश होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप सातव यांच्याकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
दिवंगत राजीव सातव हे काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून म्हणून ओळखले जात. आधी महाराष्ट्र काँग्रेस आणि नंतर ते पक्षात राष्ट्रीय पातळीवरही कार्यरत होते. काँग्रेसमध्ये उत्तम भविष्य असणारा महाराष्ट्रातील नेता, अशी त्यांची ओळख होती. मात्र करोना या जीवघेण्या आजाराने त्यांना ग्रासलं आणि त्यांचे अकाली निधन झाले. सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषद दिली. मात्र आता त्या काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याचे समजते. त्यामुळे लवकरच प्रज्ञा सातव कमळ हाती घेतील, असे समजते.
सातव कुटुंबाचा राजकीय इतिहास
राजीव सातव हे २०१४ ते २०१९ पर्यंत हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याशी जवळीक असलेल्या राजीव सातव यांचे २०२१ मध्ये निधन झाले. प्रज्ञा सातव सध्या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष आहेत आणि विधान परिषदेच्या आमदार आहेत. शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेतील जागेवर त्या २०२१ मध्ये बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये त्या दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून आल्या असून त्यांचा कार्यकाळ २०३० पर्यंत आहे. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात. २०१४ मध्ये देशभरात मोदी लाटेत काँग्रेस भुईसपाट झाली होती. महाराष्ट्रातही काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते, त्यात राजीव सातव यांचा समावेश होता. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा प्रवास करत आपली राजकीय ओळख निर्माण केली होती. काँग्रेसनेही त्यांना वेळोवेळी संधी देत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय युवक अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या.
दरम्यान, प्रज्ञा सातव यांच्या संभाव्य भाजप पक्षप्रवेशाची चर्चा सध्या तरी काँग्रेस नेत्यांकडून फेटाळली जात आहे. काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील म्हणाले की, “प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने आमदारकी दिली आहे. प्रज्ञाताई असं पाऊल उचलतील असं वाटत नाही. ही बातमी निराधार आहे, असं मला वाटतं. पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात राहू,” असं सतेज पाटलांनी म्हटलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा