1 तासापूर्वी
- कॉपी लिंक

कॉमनवेल्थ गेम्सच्या तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडू वेटलिफ्टिंग, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, लॉन बॉल्स, स्विमिंग आणि बॉक्सिंगमध्ये आव्हान देतील. भारताच्या सर्वाधिक आशा वेटलिफ्टिंगकडून असतील. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू महिलांच्या 49 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत उतरेल.
दिवसभरात एकूण 14 सुवर्णपदक स्पर्धा होतील. यापैकी सर्वाधिक 9 स्विमिंग आणि पॅरा स्विमिंगमध्ये, 3 वेटलिफ्टिंगमध्ये आणि 2 आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये असतील.

जिम्नॅस्टिक्स आणि लॉन बॉल्समध्ये अनेक सामने
जिम्नॅस्टिक्समध्ये संध्याकाळी 4:30 वाजता योगेश्वर सिंग आणि तपन मोहंती पुरुष ऑल-अराउंड फायनल खेळतील. तर रात्री 10:30 वाजता महिला ऑल-अराउंड फायनल होईल. यात भारतीय खेळाडू पात्र ठरल्यास मैदानात उतरतील.
लॉन बॉल्समध्ये दुपारी 1 वाजता रूपा राणी तिर्की आणि पिंकी सिंगची जोडी महिला पेअर्स सेक्शनल प्लेमध्ये नामिबियाशी भिडेल. तर संध्याकाळी 7:15 वाजता पुतुल सोनोवाल पुरुष सिंगल्स सेक्शनल प्लेमध्ये माल्टाच्या शॉन जेम्स पार्निसचा सामना करतील.

वेटलिफ्टिंगमध्ये तीन भारतीयांवर नजर
दुपारी 2 वाजता ऋषिकांत सिंग पुरुष 60 किलो फायनलमध्ये उतरतील. त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता मीराबाई चानू महिला 49 किलो फायनलमध्ये सुवर्णपदकासाठी मुकाबला करतील. रात्री 11 वाजता एम राजा पुरुष 65 किलो फायनलमध्ये भाग घेतील.

मीराबाई चानूने 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. तेव्हा कोविडमुळे मास्क घातला होता.
जलतरण आणि बॉक्सिंगमध्येही आव्हान
जलतरणात संध्याकाळी 4:39 वाजता श्रीहरी नटराज, आर्यन नेहरा, अनीश गौडा आणि धाक्शन शशिकुमार पुरुष 4×200 मीटर फ्रीस्टाइल रिले हीट्समध्ये उतरतील. पात्र ठरल्यास भारतीय संघ रात्री 1:56 वाजता अंतिम सामना खेळेल. हा सामना भारतीय वेळेनुसार 27 जुलै रोजी होईल.
बॉक्सिंगमध्ये रात्री 10:45 वाजता प्रीती पवार महिला 54 किलो वजनी गटाच्या राऊंड ऑफ-16 मध्ये मलावीच्या डेबोरा मटेंजेसोबत भिडणार आहे. यानंतर रात्री 11:45 वाजता जदुमणी सिंग पुरुष 55 किलो वजनी गटाच्या राऊंड ऑफ-16 मध्ये पाकिस्तानच्या मुष्टियोद्धाचा सामना करेल. 27 जुलै रोजी रात्री 12:45 वाजता आदित्य प्रताप यादव पुरुष 65 किलो वजनी गटाच्या राऊंड ऑफ-16 मध्ये युगांडाच्या मुष्टियोद्धाविरुद्ध मैदानात उतरेल.
