Headlines

Commonwealth Games 2026 : भालाफेकमध्ये भारताचा डबल धमाका, नीरज चोप्राचे रौप्य तर यशवीर सिंगला कांस्य; एका विक्रमी थ्रोने संपूर्ण गेम पालटला


Javelin Ranking commonwealth games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भालाफेकमध्ये अंतिम फेरीत भारताने दोन पदकांची कमाई करत इतिहास रचला. नीरज चोप्रा आणि यशवीर सिंग यांनी पदके जिंकलीत. सुवर्णपदकाचा मानकरी कोण ठरला? नीरजने किती मीटर भाला फेकला? सविस्तर जाणून घ्या.

Neeraj Chopra Yashvir Singh Medal
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भालाफेकमध्ये भारताने रौप्य आणि कांस्य ही पदके नावावर केलीत. नीरज चोप्राला रौप्य आणि यशवीर सिंगने कांस्य पदक जिंंकले. सुवर्णपदकाचीच सर्वांना आशा होती. श्रीलंकेच्या रुमेश तरंगा पथिरागेने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले. सुरूवातीपासून नीरज आघाडीवरच होता, मात्र रूमेशने ८९.७५ मीटरचा विक्रमी थ्रो केला आणि अग्रस्थान गाठले. शेवटच्या थ्रो वेळी नीरजने आपली सर्व ताकद लावली पण थ्रो फाऊल गेल्याने त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

भालाफेकमध्ये भारताने डबल धमाका केला. ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राने ८५.८३ मीटरचा थ्रो करत रौप्य नावावर केले. नीरज आघाडीवर होता पण श्रीलंकेच्या रूमेशने विक्रमी थ्रो केला आणि संपूर्ण चित्र पालटवून टाकले. रूमेशने ८९.७५ मीटरचा थ्रो केला आणि पहिल्या नंबरवर गेला. नीरजकडे शेवटी एक संधी होती पण थ्रो करताना लाईन क्रॉस केल्याने तो थ्रो फाऊल गेला. दुसरीकडे यशवीर सिंग याने शेवटच्या प्रयत्नात आपल्या करियरमधील सर्वात बेस्ट थ्रो करत नीरज इतकाच ८५.४१ मीटरचा थ्रो टाकला, परंतु नीरजे पॉइंट ८२ने पुढे असल्याने यशवीर तिसऱ्या स्थानी राहिला.
Maharashtra TimesSakshi Chaudhary Boxing : शेतकऱ्याच्या लेकीची गगनभरारी, बॉक्सर साक्षीनं पदक पक्कं करत रचला इतिहास, एका टर्निंग पॉइंटने बदललं आयुष्य
रोहित यादवने या हंगामात याआधी ८७ मीटरचा टप्पा गाठून दिलेला मात्र त्याला दमदार फॉर्म पुन्हा दाखवता आला नाही. मात्र यशवीर सिंगने मात्र अॅथलेटिक्सच्या सर्वात मोठ्या व्यासपीठावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याने माजी विश्वविजेता अँडरसन पीटर्सला – ज्याने शेवटच्या थ्रोमध्ये ८३.८८ मीटर फेकून चौथे स्थान मिळवले – आणि विद्यमान विश्वविजेता केशोरन वॉलकॉटला – जो ८२.५५ मीटरसह सहाव्या स्थानी राहिला – यांना मागे टाकत यशवीरने कांस्यपदक जिंकले.
Maharashtra TimesDilip Gavit Gold Video : नाशिकचा मराठमोळा सुपुत्र दिलीप गावितने राष्ट्रकुल गाजवलं, 100 मीटरमध्ये भारताला सुवर्ण, एकाच रेसमध्ये दोन पदकं
दरम्यान, भारताने भालाफेक प्रकारामध्ये एकाचवेळी दोन पदके पहिल्यांदाच जिंकली. याचे शिल्पकार नीरज चोप्रा आणि यशवीर सिंग ठरले. भारताच्या तिघांनी फायनलमध्ये धडक मारली होती, रोहित यादव हा अपयशी ठरला. त्याने ८१.५६ मीटरची कामगिरी करत सातवे स्थान मिळवले. नीरज आणि यशवीर दोघेही तिरंगा हात घेऊन एकत्र पोडियमवर उभे राहिले त्यावेळी भारतीयांची अभिमानाने छाती फुलून आली.
Maharashtra TimesCWG 2022: राष्ट्रकुल झाल्यानंतर आली धक्कादायक बातमी; दोन खेळाडू झाले बेपत्ता

ज्यूदोत सुवर्णपदकाचा डबल धमाका

भारताची ज्युदोका अस्मिता डे हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय ज्युदोका ठरली. या यशापाठोपाठ हर्ष सिंगने ज्यूदोत दुसरे सुवर्ण मिळवून दिले. महिलांच्या ४८ किलो गटाच्या अंतिम लढत्तीत अस्मिताने कॅनडाच्या हेडी क्वाचविरुद्ध ‘गोल्डन स्कोअर’वर बाजी (२-१) मारून संस्मरणीय यश मिळवले. १९९०मध्ये ऑकलंडमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्यूदोचा प्रथम समावेश झाला. त्यानंतर आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेतील ज्युदोत रौप्य आणि ब्राँझपदके मिळवली होती. मात्र, भारतीय ज्यूदोकाला आतापर्यंत एकदाही सुवर्णपदकाला गवसणी घालता आली नव्हती. या वेळी ही प्रतीक्षा त्रिपुराच्या २३ वर्षीय अस्मिताने संपवली.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा