Headlines

गिल फिट, यशस्वी हिट! श्रीलंका कसोटीआधी टीम इंडियाला मिळाली सर्वात मोठी गुड न्यूज


Shubman Gill Fitness : दुखापतीनंतर शुभमन गिलने श्रीलंका इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यात पुनरागमन केले. यशस्वी जयस्वालने अर्धशतक झळकावत गिलसोबत दमदार सुरुवात केली. पहिल्या कसोटीआधी टीम इंडियासाठी ही मोठी सकारात्मक बातमी आहे.

Shubman Gill
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्याआधी सुरू असलेल्या सराव सामन्यात भारतीय संघासाठी चांगली बातमी समोर आली आहे. कर्णधार शुभमन गिलने मैदानात पुनरागमन केले असून यशस्वी जायस्वालसोबत डावाची सुरुवात केली. यशस्वीने अर्धशतक झळकावत दमदार सुरुवात केली. दोघांनी मिळून शतकी भागीदारीच्या दिशेने वाटचाल करत भारतीय संघाला मजबूत सुरुवात करून दिली. मालिकेपूर्वी गिलची फिटनेस चाचणीही यामुळे यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.

यशस्वीचे अर्धशतक, गिलसोबत महत्त्वाची भागीदारी

श्रीलंका इलेव्हनचा डाव संपल्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. यावेळी शुभमन गिल आणि यशस्वी जायस्वाल सलामीला मैदानात उतरले. यशस्वीने संयमी फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले. गिलनेही त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे भारताच्या डावाला स्थैर्य मिळाले. दोघांच्या फलंदाजीमुळे भारतीय संघाला सराव सामन्यात मोठा सकारात्मक संकेत मिळाला आहे.

Maharashtra TimesRohit Sharma News : रोहितनं अजून किती परीक्षा द्यायच्या? २०२७ वर्ल्डकपवरुन अजिंक्य रहाणेने निवड समितीला सुनावलं, काय म्हणाला?

पहिल्या कसोटीसाठी गिलची उपलब्धता स्पष्ट

विशेष म्हणजे, गुरुवारी सरावादरम्यान गिलच्या अनामिकेला दुखापत झाली होती. त्यामुळे सराव सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांत तो मैदानात उतरला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलने भारताचे नेतृत्व केले होते. मात्र, आता गिलने नेटमध्ये सराव केल्यानंतर प्रत्यक्ष सामन्यातही फलंदाजी केली आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न सुटला आहे.

गिलने रविवारी श्रीलंकेच्या डावादरम्यान नेटमध्ये एक तासाहून अधिक वेळ सराव केला. त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात तो फलंदाजीसाठी उतरला. त्यामुळे १५ ऑगस्टपासून गॉलमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी तो उपलब्ध राहण्याची शक्यता वाढली आहे.

Maharashtra TimesRishabh Pant : ऋषभ पंतला कुठे मिळणार जमीन? मुख्यमंत्र्यांचा 12 तासांतच प्रतिसाद, पुष्कर सिंह धामी नेमकं काय म्हणाले?

गिलचा कसोटीतील अनुभव

गिल हा भारतीय कसोटी संघातील महत्त्वाचा फलंदाज आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने आतापर्यंत ४१ कसोटींमध्ये ४३.६६च्या सरासरीने २९६९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ११ शतके आहेत. त्याची सर्वोच्च खेळी २६९ धावांची आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी १५ ऑगस्टपासून गॉलमध्ये होणार आहे. दुसरी कसोटी २३ ते २७ ऑगस्टदरम्यान कोलंबोमध्ये होईल. तब्बल नऊ वर्षांनंतर भारतीय संघ श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. त्यामुळे या मालिकेपूर्वी गिलचे मैदानात परतणे आणि यशस्वीचे अर्धशतक ही टीम इंडियासाठी महत्त्वाची सकारात्मक बातमी ठरली आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा