Javelin Ranking commonwealth games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भालाफेकमध्ये अंतिम फेरीत भारताने दोन पदकांची कमाई करत इतिहास रचला. नीरज चोप्रा आणि यशवीर सिंग यांनी पदके जिंकलीत. सुवर्णपदकाचा मानकरी कोण ठरला? नीरजने किती मीटर भाला फेकला? सविस्तर जाणून घ्या.

भालाफेकमध्ये भारताने डबल धमाका केला. ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राने ८५.८३ मीटरचा थ्रो करत रौप्य नावावर केले. नीरज आघाडीवर होता पण श्रीलंकेच्या रूमेशने विक्रमी थ्रो केला आणि संपूर्ण चित्र पालटवून टाकले. रूमेशने ८९.७५ मीटरचा थ्रो केला आणि पहिल्या नंबरवर गेला. नीरजकडे शेवटी एक संधी होती पण थ्रो करताना लाईन क्रॉस केल्याने तो थ्रो फाऊल गेला. दुसरीकडे यशवीर सिंग याने शेवटच्या प्रयत्नात आपल्या करियरमधील सर्वात बेस्ट थ्रो करत नीरज इतकाच ८५.४१ मीटरचा थ्रो टाकला, परंतु नीरजे पॉइंट ८२ने पुढे असल्याने यशवीर तिसऱ्या स्थानी राहिला.
Sakshi Chaudhary Boxing : शेतकऱ्याच्या लेकीची गगनभरारी, बॉक्सर साक्षीनं पदक पक्कं करत रचला इतिहास, एका टर्निंग पॉइंटने बदललं आयुष्य
रोहित यादवने या हंगामात याआधी ८७ मीटरचा टप्पा गाठून दिलेला मात्र त्याला दमदार फॉर्म पुन्हा दाखवता आला नाही. मात्र यशवीर सिंगने मात्र अॅथलेटिक्सच्या सर्वात मोठ्या व्यासपीठावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याने माजी विश्वविजेता अँडरसन पीटर्सला – ज्याने शेवटच्या थ्रोमध्ये ८३.८८ मीटर फेकून चौथे स्थान मिळवले – आणि विद्यमान विश्वविजेता केशोरन वॉलकॉटला – जो ८२.५५ मीटरसह सहाव्या स्थानी राहिला – यांना मागे टाकत यशवीरने कांस्यपदक जिंकले.
Dilip Gavit Gold Video : नाशिकचा मराठमोळा सुपुत्र दिलीप गावितने राष्ट्रकुल गाजवलं, 100 मीटरमध्ये भारताला सुवर्ण, एकाच रेसमध्ये दोन पदकं
दरम्यान, भारताने भालाफेक प्रकारामध्ये एकाचवेळी दोन पदके पहिल्यांदाच जिंकली. याचे शिल्पकार नीरज चोप्रा आणि यशवीर सिंग ठरले. भारताच्या तिघांनी फायनलमध्ये धडक मारली होती, रोहित यादव हा अपयशी ठरला. त्याने ८१.५६ मीटरची कामगिरी करत सातवे स्थान मिळवले. नीरज आणि यशवीर दोघेही तिरंगा हात घेऊन एकत्र पोडियमवर उभे राहिले त्यावेळी भारतीयांची अभिमानाने छाती फुलून आली.
CWG 2022: राष्ट्रकुल झाल्यानंतर आली धक्कादायक बातमी; दोन खेळाडू झाले बेपत्ता
ज्यूदोत सुवर्णपदकाचा डबल धमाका
भारताची ज्युदोका अस्मिता डे हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय ज्युदोका ठरली. या यशापाठोपाठ हर्ष सिंगने ज्यूदोत दुसरे सुवर्ण मिळवून दिले. महिलांच्या ४८ किलो गटाच्या अंतिम लढत्तीत अस्मिताने कॅनडाच्या हेडी क्वाचविरुद्ध ‘गोल्डन स्कोअर’वर बाजी (२-१) मारून संस्मरणीय यश मिळवले. १९९०मध्ये ऑकलंडमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्यूदोचा प्रथम समावेश झाला. त्यानंतर आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेतील ज्युदोत रौप्य आणि ब्राँझपदके मिळवली होती. मात्र, भारतीय ज्यूदोकाला आतापर्यंत एकदाही सुवर्णपदकाला गवसणी घालता आली नव्हती. या वेळी ही प्रतीक्षा त्रिपुराच्या २३ वर्षीय अस्मिताने संपवली.

