CM फडणवीसांवर बोचरी टीका; दाभोलकरांशी तुलना केल्याने हर्षवर्धन सपकाळ सुप्रिया सुळेंवर संतापले – harshvardhan sapkal lashes out at supriya sule for comparing devendra fadnavis to narendra dabholkar
CM फडणवीसांवर बोचरी टीका; दाभोलकरांशी तुलना केल्याने हर्षवर्धन सपकाळ सुप्रिया सुळेंवर संतापले – harshvardhan sapkal lashes out at supriya sule for comparing devendra fadnavis to narendra dabholkar
कॅप्टन अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेचं शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केलं. सुप्रिया सुळेंनी फडणवीसांची तुलना नरेंद्र दाभोलकर यांच्याशी केली. फडणवीस हे दाभोलकरांचा वारसा पुढे नेत असल्याचं विधान सुळेंनी केलेलं. मात्र सुळेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद होण्याची शक्यता आहे. कारण यावरून काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांनी खुलासा करून विधान मागे घ्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.