China Gold Buying 2026: एकीकडे अख्ख्या जगाचे लक्ष तेलाचा पुरवठा आणि अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षाच्या हालचालींकडे लक्ष लागून आहे तर दुसरीकडे, भारताचा शेजारी – चीन – ने सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. ड्रगन तेलसोडून सोन्याचा पाठपुरावा करत आहे. यावर्षी 2026 मध्ये चीनने आतापर्यंत 820 टन सोन्याने आपल्या तिजोरीत भर पाडली असून ही खरेदी चीनच्या सुविचारित चाल आहे, ज्याचा परिणाम अमेरिकेपासून भारतापर्यंत होईल.

चीनची जून महिन्यातील सोने खरेदी
चीनच्या प्रत्येक हालचालीचा जागतिक गुंतवणूकदारांवर प्रभाव पडतो. मार्च 2024 नंतर चीनने जूनमध्ये सर्वाधिक सोन्याची खरेदी केली असून या काळात 173 टनांहून अधिक सोन्याची आयात केल्याचे चिनी सीमाशुल्क विभागाच्या माहितीवरून समोर आले आहे, जी मार्च 2024 नंतरची एका महिन्यातील सर्वाधिक आयात आहे.
चीन सोन्यामागे हात धुवून लागला
गेल्या काही महिन्यांतील सोन्याभोवती जागतिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर चिनी गुंतवणूकदार आणि मध्यवर्ती बँका जराही विचलित झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे, पश्चिम आशियातील इराण युद्धामुळे संपूर्ण जग तेल आणि गॅसच्या संकटाला सामोरे जात असताना भारताचाच शेजारी मात्र तेलाऐवजी सोन्याची खरेदी करत आहे. जून 2026 मध्ये चीनची कच्च्या तेलाची आयात जवळपास 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली, तर सोने खरेदीने नवीन उच्चांक गाठला.
चीन इतकं सोनं की खरेदी करतोय?
एकीकडे मध्यपूर्वेतील युद्ध आणि तेल व गॅस संकटांमुळे जग अस्वस्थ झालं असताना डोनाल्ड ट्रम्प पुन्हा टॅरिफचा राग आलापात आहेत. यातही चीन सोने खरेदीची कोणतीही संधी सोडत नाही आणि आंतरराष्ट्रीय घसरणीचा फायदा घेत चीनने जूनमध्ये सोन्याच्या आयातीत लक्षणीय वाढ केली.आंतरराष्ट्रीय घसरणीचा फायदा घेत चीनने जूनमध्ये सोन्याच्या आयातीत लक्षणीय वाढ केली. सोने खरेदी केले, जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील खरेदीच्या दुप्पट आहे. केवळ फिजिकल सोनंच नव्हे तर ETF मध्येही चिनी लोक गुंतवणूक वाढवत असून यावर्षी आतापर्यंत 28 टन सोन्याची गुंतवणूक केली गेली आहे.
चीनचा ‘गोल्ड’गेम काय आहे?
केवळ किरकोळ गुंतवणूकदारच नव्हे, तर चीनच्या मध्यवर्ती बँकेनेही सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. चीनकडे 2,346 मेट्रिक टन सोन्याचा साठा असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरातील प्रत्येक घसरण चीनला नवीन संधी देत आहे. घसरत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर चीनने सुवर्ण साठ्यात भर घालणे सुरू ठेवले असून घसरत्या किंमतीत चीनचा सोन्यावरील विश्वास अडिग राहिला आणि वेगाने खरेदीचा कल कायम ठेवला आहे.
चीनची सोने खरेदी अमेरिकेसाठी डोकेदुखी
चीन सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक देश असून याच वेगाने सोन्याची खरेदी सुरू ठेवल्यास त्याचा सराफा बाजारावर निश्चितच परिणाम होईल. चीन आपलं चलन मजबूत करण्यासाठी सोन्याचा वापर करत असल्याचं अलीकडच्या या खरेदीवरून दिसून येते. परकीय चलनात सोन्याचा वाटा वाढवून चीन अमेरिकी डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देत आहे. भारताचा शेजारी सोन्याला ढाल बनवून डॉलरवर मात करण्याचा प्लॅन करत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
चीनच्या गोल्डन खेळीचा भारतावर काय परिणाम होणार?
चीनने जोमाने सोने खरेदी सुरू ठेवल्यास जागतिक बाजारात सोन्याची मागणी कायम राहील आणि वाढती मागणी दरवाढीला बळ देईल. अशा परिस्थितीत, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढल्यास भारतातील सोन्याच्या किमती तुलनेने उच्च राहू शकतात.
1 जूनपासून सुरू केलीये परवाना प्रणाली
दुसरीकडे, गेल्या महिन्यापासून चीनने सोने खरेदीसाठी परवाना पद्धत सुरू केली आहे. यानुसार पीपल्स बँक ऑफ चायनाकडून वेळोवेळी अत्यंत नियंत्रित कोट्यावर आधारित सोने आयात करण्याचे परवाने जारी केले जातील. 1 जून रोजी लागू झालेल्या या नव्या परवाना प्रणालीमुळे आयातीला चालना मिळण्याची अपेक्षा होती, ज्यामुळे बँकांना विद्यमान कोट्याचा पूर्णपणे वापर करण्यास प्रोत्साहन मिळू शकेल.

