Headlines

Gold Silver Price Today 28 July 2026; सोन्याचा दर पुन्हा बदलला, चांदी 3000 रुपयांनी स्वस्त; भविष्यातही भाव असाच कमी होणार का? अमेरिकेतल्या हालचालींकडे नजर


Gold Silver Price Drop: सोन्या-चांदीच्या दरांमध्ये चढउताराचा कल सुरू आहे. भू-राजकीय तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे आदल्या दिवशी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती सावरल्या होत्या, तर मंगळवारी (27 जुलै) मजबूत डॉलर आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांविषयी महत्त्वाच्या बैठकीआधी सोने-चांदीच्या बाजारातील गुंतवणूकदार सावध राहिल्याच पाहायला मिळत आहे.

सोने-चांदीचा आजचा दर काय

सोन्याच्या किमती सतत चढ-उतार होत असताना अमेरिका-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या चढउताराच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात बदल होताना दिसत आहेत. मंगळवार, 27 जुलै रोजी, देश-विदेशातील सोने-चांदीच्या दरांत किंचित घसरण नोंदवली गेली. स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस सुमारे $4,056.03 होता, तर ऑगस्ट अमेरिकी सोन्याचा वायदा भाव प्रति औंस सुमारे $4,056.70 वर राहिला. अशाप्रकारे, दोन्ही ठिकाणी किमान सुमारे 0.5 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.

Maharashtra TimesShare Market: लक्ष्मीची पावले घेऊन आला चिनी IPO; लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 500% भरारी! किरकोळ गुंतवणुकीवर लाखोंची कमाई
याशिवाय देशांतर्गत फ्युचर्स बाजारात, MCX वर, सोन्याचा वायदा दर 0.62% किंवा 893 रुपयांनी कमी होऊन 1,42,170 रुपयांवर व्यवहार करत होता, तर चांदीचे फ्युचर्स तब्बल 1.39 टक्के किंवा 3000 रुपयांनी कमी होऊन 2,18,090 रुपयांवर खाली आले.

सोने-चांदीच्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा फॅक्टर

मजबूत अमेरिकी डॉलर आणि फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी गुंतवणूकदारांची सावधगिरी अलीकडच्या घसरणीमागचे प्रमुख कर्ण असल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या अख्ख्या जगाचे लक्ष फेड रिझर्व्हच्या दोन दिवसीय बैठकीकडे लागून असेल जिथे यंदाही व्याजदर ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील काही दिवसांत कोणते निर्णय घेतले जाऊ शकतात याबाबत संकेत बाजाराची दिशा ठरवतील, त्यामुळे गुंतवणूकदार सध्या मोठी गुंतवणूक करणे टाळत आहेत.

Maharashtra TimesTatkal Ticket New Rules: तात्काळ तिकीट बुकिंगचा नवा नियम, 1 ऑगस्टपासून सर्वसामन्यांची मोठी अडचण दूर होणार; काय आहे नवीन प्रोसेस?

डॉलरमुळे सोन्यावर दबाव का?

सोने आणि डॉलरचे नेहमीच एक विशेष नाते मानले जाते. अमेरिकन चलन मजबूत होतो, तेव्हा इतर देशांतील गुंतवणूकदारांसाठी सोने खरेदी करणे अधिक महाग होते, ज्याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर होतो, परिणामी किंमतीत घट होते.

त्याचवेळी, फेडरल रिझर्व्हकडून यावेळी व्याजदर स्थिर राहण्याचे बाजाराला अपेक्षा आहे. पण येत्या काही महिन्यांत दर वाढवले ​​जाऊ शकतात, अशी गुंतवणूकदारांमध्ये कुचबुक सुरू आहे. पुढील बैठकीत दरवाढ होण्याची शक्यता पूर्वीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढल्याचे पाहायला मिळत असताना असे झाल्यास सोन्यावरील दबाव आणखी वाढू शकतो.

मुंबईतील सोने-चांदीचा दर काय

24 कॅरेट सोन्याचा भाव 1,45,870 रुपये प्रति 10 ग्रॅम

22 कॅरेट सोन्याचा भाव 1,33,710 रुपये प्रति 10 ग्रॅम

18 कॅरेट सोन्याचा भाव 1,09,400 रुपये प्रति 10 ग्रॅम

एक किलोचा चांदीचा दर 2,39,900 रुपये आहे.