China Export Controls on AI Models and Chips; चीनचा एआयच्या माध्यमातून जगावर राज्य करण्याचा गेमप्लॅन; भारतासह सर्वांसमोर मोठे संकट उभे करणार?; एका चालीने चेकमेट करणार
China Export Controls on AI Models and Chips; चीनचा एआयच्या माध्यमातून जगावर राज्य करण्याचा गेमप्लॅन; भारतासह सर्वांसमोर मोठे संकट उभे करणार?; एका चालीने चेकमेट करणार
China AI Game Plan: आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात सध्या अमेरिका आणि चीनमध्ये शर्यत रंगली आहे. अमेरिकेत सायबरसुरक्षा आणि विकसित AI मॉडेल्सच्या मर्यादित उपलब्धतेबद्दल चिंता व्यक्त केल्या गेल्यावर आता चीन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे ज्यामुळे जागतिक स्तरावर तीव्र संताप निर्माण होऊ शकतो.
अमेरिकेपेक्षा चीन या AI शर्यतीत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असून भारताचा शेजारी आता इतर देशांना एआय तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर चिप्सच्या निर्यातीवर बंदी लादण्याची शक्यता आहे. चीनने ही बंदी लादली तर संरक्षण, वाहन उद्योग, डेटा सेंटर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या उद्योगांसाठी ड्रॅगन मोठा धोका निर्माण करू शकतो.
एफटीच्या एका अहवालाचा हवाला देत बिझनेस टुडेच्याने ही माहिती दिली. यानुसार चीन एआय तंत्रज्ञान आणि चिप निर्यातीशी संबंधित नियम अधिक कडक करण्याची तयारी करत असून सर्वात प्रगत एआय तंत्रज्ञान एक सामरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून देशातच ठेवण्याचा चीनचा उद्देश आहे. अशा परिस्थितीत, चीन अलीबाबा, बाइटडान्स आणि झिपू यांसारख्या या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांशी चर्चा करत असल्याचे अहवालात पुढे दावा केला गेला आहे.
चीनचे वाणिज्य मंत्रालय चिनी एआय आणि सेमीकंडक्टर कंपन्यांसोबत सुरक्षा उपायांवर चर्चा करत असून प्रशिक्षण डेटा देशाबाहेर हस्तांतरित करण्याचा आणि परदेशी वापरकर्त्यांना एआय मॉडेल्स डाउनलोड करण्यावर बंदी घालण्याच्या चीनमध्ये हालचाली सुरू आहेत. यामुळे इतर देशांकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर किंवा नक्कल होण्याचा धोका कमी होईल, असे चीनचे म्हणणे अहवालातून समोर आले आहे.
याव्यतिरिक्त, चीन क्वालकॉम आणि TSMC सारख्या परदेशी चिप उत्पादकांना चिनी डिझाइनवर आधारित चिप्सचे उत्पादन करण्यापासून रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्याची अहवालात शक्यता वर्तवली गेली आहे. अशाप्रकारे, चीन एकूणच आपल्या चिप डिझाइनवर नियंत्रण मिळवण्याचा आणि देशांतर्गतच ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
जागतिक बाजारात सर्वात प्रगत सेमीकंडक्टर चिप्सच्या निर्मितीमध्ये चीन सर्वात मोठा देश नाही, पण तैवान, दक्षिण कोरिया आणि अमेरिका आघाडीवर आहेत. मात्र, चीन प्रामुख्याने चिप पॅकेजिंग आणि काही विशिष्ट प्रकारच्या चिप्सचे उत्पादन करतो.
भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात चीनने हेलियम निर्यातीवर बंदी लादली आणि अख्ख्या जगाला धक्का दिला. एकटा चीन आपल्या हेलियमपैकी 80% निर्यात करतो, पण अलीकडच्या बंदीमुळे चिप क्षेत्र आणखी एका टेन्शनमध्ये सापडले आहे, कारण सेमीकंडक्टर प्रकल्पांसाठी हेलियम गॅस अत्यावश्यक असतो. अशा परिस्थितीत, चीनने हेलियमवरील निर्बंध उठवले नाही तर, चिप उत्पादकांना वाढीव खर्च आणि पुरवठ्याच्या जोखमीचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि चिप वापरणाऱ्या उत्पादनांच्या किमती वाढू शकतात.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा