Vicky kaushal New brand ambassador of tata motors: सध्या विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट संपूर्ण जगभरात गाजत आहे. विकी कौशलच्या अभिनयाने सर्वांचीच मन जिंकली आहेत तसेच त्याचे विशेष कौतुकही केले जात आहे. असे असताना आता टाटा मोटर्सने विकी कौशलला आपल्या कंपनीच्या नवीन ब्रँड अँम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.

कंपनीने काय सांगतिले?
या नवीन कोलैबोरेशनच्या निमित्ताने टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलीटी लिमिटेडचे कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवास्तव म्हणाले की, आम्ही वांरवार नवीन बाउंड्रीला क्रोस करत आहोत. असे असताना आज विकी कौशलाल ब्रँड अॅम्बेसेडर बनवताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सध्या विकी कौशलचा छावा चित्रपट खूप गाजत आहे आणि त्याचे कौतुकही होत आहे. आज विकी कौशल आमच्या कंपनीशी जोडला गेला आहे हा क्षण आमच्यासाठी अत्यंत खास आहे.
टाटा कर्व्हसह कँपेनला वाढवणार कौशल
दुसरीकडे या कोलैबोरेशनवर विकी कौशल बोलातांना म्हणाले की, टाटा मोटर्सचा अतूट वारसा आणि इनोवेशन प्रति कमिटमेंट जपण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आता विकी कौशल आगामी इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये टाटा कर्व्हला ऑफिशियल कार बनवण्याच्या कँपेनला वाढवणार आहे. इथे एक सांगायचे झाल्यास टाटा मोटर्स आपली कूप-स्टाईल एसयूव्ही कर्व्हला आयपीएल 2025 साठी ऑफिशियल घोषित करेल.
टाटा कर्व्ह फीचर्स
18 इंच व्हिल्सव्यतिरिक्त, एसयूव्हीमध्ये 190 मिमी ग्राउंड क्लीयरन्स, 450 मिमी वॉटर वेडिंग कॅपेसीटी, फ्लश डोअर हँडल, 500 लिटर बूट स्पेस, कनेक्ट केलेले ॲप्स, एलईडी लाइट्स, व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टी ड्राईव्ह मोड्स, ॲम्बियंट लाइट, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर टेलगेट आहे. स्टार्टर ॲक्टिव्हेशन, क्रूझ कंट्रोल, एअर प्युरिफायर, रेन सेन्सिंग वायपर्स, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
लेव्हल-2 ADAS चाही समावेश
Tata Curvv EV अतिशय सेफ्टी बनवण्यात आले आहे. याशिवाय यात अशी अनेक फीचर देखील देण्यात आली आहेत जी प्रवासादरम्यान प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. एसयूव्हीमध्ये स्टँडर्ड म्हणून सहा एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. याशिवाय यात थ्री पॉइंट ईएलआर सीटबेल्ट, सीटबेल्ट अँकर प्री-टेन्शनर, फोर्टिफाइड बॉडी स्ट्रक्चर, आयसोफिक्स, लेव्हल-2 एडीएएस 20 सेफ्टी फीचर्स, ईएसपी, ईपीबी, 360 सराउंड व्ह्यू, फ्रंट पार्किंग सेन्सर यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. Tata Curvv च्या इलेक्ट्रिक व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 17.49 लाख रुपये आहे.
इंजिन आणि पॉवरट्रेन
Tata Curvv EV दोन बॅटरी ऑप्शनसह लाँच करण्यात आली आहे. या SUV मध्ये 45 kWh आणि 55kWh कॅपेसीटीचा बॅटरी ऑप्शन आहेत. ज्यामध्ये लाँग रेंज व्हेरिएंटला फुल चार्जमध्ये 585 किलोमीटर एआरएआय रेंज मिळते. आणि 45 kWh बॅटरीसह ती 502 किमी एआरएआय रेंज मिळते. 70kW कॅपेसीटीच्या चार्जरसह, 10 ते 80 टक्के चार्ज फक्त 40 मिनिटांत होऊ शकते. ही SUV केवळ 15 मिनिटांत 150 किलोमीटरपर्यंतची रेंज देते.

