Headlines

Chhatrapati Sambhajinagar Chikalthana MIDC IT Park Accident Two Brothers Die On the Spot; ‘मामा, दादाची ड्युटी संपली, मी घेऊन येतो’; दोन्ही भाचे पुन्हा परतलेच नाहीत, सख्ख्या भावांचा करुण अंत; बापावर लेकरांना खांदा देण्याची वेळ


Chhatrapati Sambhajinagar Accident News : छत्रपती संभाजीनगरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा करुण अंत झाला आहे.

_Chhatrapati Sambhajinagar Accident News
चिकलठाणा अपघात दोन भावांचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : ‘मामा, दादाची ड्युटी संपली असेल, मी त्याला घेऊन येतो’, असं सांगून मामाच्या घरातून विश्वासाने बाहेर पडलेला धाकटा मुलगा आणि रात्रभर कष्ट करून घरी परतणारा मोठा भाऊ, दोघेही पुन्हा कधीच घरी परतले नाहीत. चिकलठाणा एमआयडीसीतील आयटी पार्कच्या मागील रस्त्यावर काळ बनून आलेल्या एका भरधाव कारने या दोन भावांचा संसार आणि एका बापाचं स्वप्न एका क्षणात मातीत मिळवलं. या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच दुर्दैवी अंत झाला असून, या घटनेनं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहर सुन्न झालं आहे. निखिल अंकुश आरके (वय 23) आणि कपिल अंकुश आरके (वय 18, दोघे रा. बंजारा कॉलनी, सिल्लोड) अशी निष्प्राण झालेल्या दोन तरुण भावांची नावे आहेत.

नेमका अपघात कसा झाला?

सिल्लोडच्या ग्रामीण भागात मिस्त्रीकाम करून कष्टात दिवस काढणाऱ्याअंकुश आरके यांनी आपल्या पोटच्या पोरांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, म्हणून अवघ्या दोन महिन्यांपूर्वी निखिल आणि कपिलला शहरात राहणाऱ्या मामा फकिरा पवार यांच्याकडे पाठवलं होतं. दोघंही सिडकोतील प्रोझोन मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये प्रामाणिकपणे काम करत होते.

Maharashtra TimesMumbai News : आधी मित्राची कार दामटवली, मग थेट पोलिसांचं वाहन पळवून कोस्टल रोडवर धुमाकूळ, अनेक वाहनांना धडक, माथेफिरु ताब्यात

भाऊ एकत्र आनंदाने घराच्या दिशेने

बुधवारी रात्री 9 वाजता लहान भाऊ कपिल कामावरून मामाच्या घरी आला. रात्री 1 वाजता मोठा भाऊ निखिल सुटणार होता. दादाला एकटं वाटायला नको म्हणून कपिल दुचाकी घेऊन त्याला आणायला गेला. दोन्ही भाऊ एकत्र आनंदाने घराच्या दिशेने निघाले; पण नियतीचा डाव वेगळाच होता. आयटी पार्कच्या मागील रस्त्यावर समोरून चुकीच्या बाजूने आलेल्या एका भरधाव फॉरच्यूनर कारने (MH 28 BS 0990) त्यांच्या दुचाकीला अशी जोरदार धडक दिली की दुचाकीचा चक्काचूर होऊन तिचे भाग थेट कारच्या बोनेटमध्ये घुसले.

‘पोलीस बोलतोय, अपघात झालाय…’ अन् मामाच्या पायाखालची जमीन सरकली

रात्र उलटली तरी दोन्ही भाचे घरी न आल्यानं काळजीपोटी मामा फकिरा पवार यांनी कपिलच्या नंबरवर वारंवार फोन फिरवले. सुरुवातीला कोणीच फोन उचलला नाही. अखेर पलीकडून एका पोलीस अधिकाऱ्याचा आवाज आला ‘तुमच्या मुलांचा अपघात झालाय, तातडीने घाटी रुग्णालयात या’. डॉक्टरांनी दोन्ही मुलांचे मृतदेह ठेवले, तेव्हा कुटुंबाने मांडलेला हंबरडा पाहून घाटी रुग्णालयातील दगडी भिंतीही हळहळल्या. ज्या हातांनी मुलांच्या भविष्याची स्वप्ने रंगवली होती, त्याच बापावर आज दोन तरुण मुलांच्या मृतदेहांना खांदा देण्याची वेळ आली.

Maharashtra TimesRatnagiri News : कपडे धुण्यासाठी नदीवर, अचानक मगरीचा हल्ला, पोटच्या 10 वर्षीय लेकीनं आईला मरणाच्या दारातून वाचवलं; नेमकं काय घडलं?

कार सोडून चालक फरार

अपघात घडवल्यानंतर कारचालक गाडी घटनास्थळीच सोडून पसार झाला. एमआयडीसी सिडको पोलिसांनी मामा फकिरा पवार यांच्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी अधिकारी गणपत राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फरार कारचालकाचा कसून शोध घेत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा