Chembur School Bus Tree fell Accident Vihan Shrivastav Mother Juhi Shrivastav hold Son Bat says He Has To Go Play Crime News; माझा विहान येईल आणि क्रिकेट खेळायला जाईल! स्कूलबस अपघातात लेकाचा मृत्यू, आई हातात बॅट घेऊन शून्यात हरवलेली
Chembur School Bus Tree fell Accident Vihan Shrivastav Mother Juhi Shrivastav hold Son Bat says He Has To Go Play Crime News; माझा विहान येईल आणि क्रिकेट खेळायला जाईल! स्कूलबस अपघातात लेकाचा मृत्यू, आई हातात बॅट घेऊन शून्यात हरवलेली
Chembur School Bus Accident : विहानची आई जुही लेकाची क्रिकेट बॅट हातात धरुन शून्य नजरेने बसलेली दिसते, तर कोणीतरी तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : स्कूल बसवर झाड पडल्याने मंगळवारी चेंबूरमध्ये ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरणे विहानची आई जुही श्रीवास्तवला कठीण जात आहे. विहानच्या मृत्यूला काही तास उलटल्यानंतरही जुही त्याची क्रिकेटची बॅट घट्ट धरुन बसली आहे. तिला ठाम विश्वास आहे की, तिचा मुलगा नेहमीप्रमाणे शाळेतून परत येईल आणि खेळायला जाईल.
आई शून्यात हरवली
चेंबूरमधील युनिव्हर्सल स्कूलमधून घरी परतत असताना स्कूल बसवर झाड कोसळल्याने विहानचा मृत्यू झाला आणि इतर चार मुले जखमी झाली. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, विहानची आई जुही लेकाची क्रिकेट बॅट हातात धरुन शून्य नजरेने बसलेली दिसत आहे. कोणीतरी तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहे.
शेजाऱ्यांनी सांगितलं माऊलीचं दुःख
श्रीवास्तव कुटुंबाच्या शेजारी राहणारे मल्होत्रा सांगतात की, विहान हा एक हुशार मुलगा होता आणि तो अनेकदा त्यांचा मुलगा देव याच्याकडे क्रिकेट शिकण्यासाठी जायचा. “जुहीवर ओढवलेल्या या असीम दुःखाचे वर्णन केवळ तीच करु शकते. विहान अनेकदा आमच्या घरी यायचा आणि मला म्हणायचा, ‘आंटी, मला व्यावसायिक पातळीवर क्रिकेट खेळायचे आहे. देवला मला क्रिकेट शिकवायला सांगा.’ तो अतिशय समजूतदार, हुशार आणि उत्तम संस्कार असलेला मुलगा होता; त्याचे स्वप्न क्रिकेटपटू बनण्याचे होते” अशी आठवण मल्होत्रा यांनी सांगितली. Ketan Agarwal Dance VIDEO : आनंदात डान्स करणारा केतन, उत्साहात नाचणारे अग्रवाल; जुना व्हिडिओ पाहून नेटिझन्स हळहळले
आईसाठी विहान सर्वस्व
“विहानच्या आईचे त्याच्यावर खूप प्रेम होते; तोच तिचे सर्वस्व होता. तिला त्याची सतत काळजी वाटायची. विहान घराबाहेर असताना ती दिवसभर त्याला व्हिडिओ कॉल करुन त्याची विचारपूस करायची. आजही ती त्याची क्रिकेटची बॅट हातात घेऊन बसली आहे. विहान आता या जगात नाही, हे स्वीकारणे तिला खूप कठीण जात आहे. ‘विहानला क्रिकेट खेळायला जायचे आहे’ असे ती अजूनही म्हणत आहे” असे शेजाऱ्यांनी सांगितले.
इतर मुलं थोडक्यात वाचली
घटना घडली त्यावेळी कृष्णा रॉय हा इयत्ता आठवीतील विद्यार्थी बसमध्येच होता. आम्हाला मोठा आवाज आला आणि बसवर एक मोठी फांदी पडली. आम्ही सगळेच बसमध्येच अडकलो. मग तिथे राहणाऱ्या लोकांनी धावाधाव केली आणि एक एक करून आम्हाला बाहेर काढून रुग्णालयात नेले, असे त्याने सांगितले. कृष्णावर ओपीडीमध्ये उपचार करून संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घरी सोडले.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयाला भेट देत जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच विहानच्या घरी जाऊन त्यांनी त्याच्या पालकांचे सांत्वनही केले. या जखमी विद्यार्थ्यांच्या उपचाराचा सर्व खर्च शासनातर्फे केला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच विहानच्या पालकांनाही कशा पद्धतीने मदत करता येईल, याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा