Headlines

Chandrapur Mayor Election How BJP Shiv Sena UBT Uddhav Thackeray unite against Congress; ठाकरेंची साथ, भाजपची ‘सायलेंट’ सत्ताखेळी; सर्वाधिक जागा मिळवूनही काँग्रेस सत्तेबाहेर कसं? वाचा इन्साईड स्टोरी


Chandrapur Mayor Election Result : चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक २७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, मात्र सत्तास्थापनेसाठी हालचाली वाढल्या असतानाच काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद वाढला

Uddhav Thackeray Devendra Fadnavis Maharashtra Times (3)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पंकज मोहरीर, चंद्रपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार, तसेच आमदार किशोर जोरगेवार शांतपणे शिवसेना (उबाठा) शी वाटाघाटी करत असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद मिटवण्यात व्यस्त होते. अंतर्गत कलहामुळे काँग्रेसचे २७ नगरसेवक शेवटपर्यंत एकत्र येऊ शकले नाहीत. काँग्रेसमधील याच अंतर्गत वादाचा फायदा भाजपने घेतला. या घडामोडीतच भाजपने ‘सायलेंट’ खेळी करून बाजी मारत चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन केली.

काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी

चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक २७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. सत्तास्थापनेसाठी हालचाली वाढल्या असतानाच काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद वाढला. महापौरपदासाठी पक्षातून आपल्याच गटाला उमेदवारी मिळावी म्हणून दोन्ही नेते अडून बसले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मध्यस्थीनंतरही हा वाद संपत नसल्याचे दिसताच दिल्ली दरबारी जाऊन चर्चा करण्यात आली.

आदल्या दिवसापर्यंत एकमत होईना

दोन दिवसांच्या चर्चेनंतर महापौरपद धानोरकर गटाला तर उपमहापौरपद वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकाला देण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र महापौरपदासाठी चार अर्ज दाखल झाल्याने नेमक्या नावावर निवडणुकीच्या आदल्या दिवशीपर्यंत एकमत होऊ शकले नव्हते. तिकडे शिवसेना (उबाठा) महापौरपदावर कायम असल्याने सोमवारी वडेट्टीवार आणि केदार यांच्यात नागपुरात आघाडीच्या अनुषंगाने बैठक झाली. काँग्रेसचा महापौर होणार असे काँग्रेस विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस-ठाकरेसेना बैठका निष्फळ

शिवसेना (उबाठा)ही महापौरपद देणाऱ्यालाच पाठिंबा देणार असल्याचे सांगत असल्याने पेच निर्माण झाला होता. मंगळवारी सकाळी वडेट्टीवार आणि शिवसेना (उबाठा)चे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना (उबाठा)ने महापौरपदाची मागणी केली, मात्र काँग्रेसकडून त्यास नकार मिळाल्याने बैठक निष्फळ ठरली. नाराज झालेले गिऱ्हे बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर काही वेळातच भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा करण्यात आली. भाजपकडून महापौरपद देण्याची कबुली मिळाल्याने वेगळा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Maharashtra TimesNirmala Nawale : हा पराभव अनपेक्षित, माजी सरपंच निर्मला नवले यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, माझ्या नेतृत्वावर…
काँग्रेसमध्ये हे घडत असताना भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी वादावर पडदा टाकत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून काम सुरू केले. ‘पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. चर्चा पूर्ण झाली की लेखी स्वरूपात करार होणार असून भाजपचाच महापौर होणार’, असे मुनगंटीवार यांनी दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते.

Chandrapur : काँग्रेसला धक्का, चंद्रपूर महापालिकेत भाजप – शिवसेना ठाकरे गटाची युती

‘वंचित’ची चंद्रपूर कार्यकारिणी बरखास्त

महापालिकेतील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक गैरहजर राहिले. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी दिले आहे.
Maharashtra TimesPravin Tidme : उपमहापौरपद न मिळाल्यामुळे नाराज, नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा इशारा; एकनाथ शिंदे भेटून म्हणाले, ‘बंटीवर मी…’
चंद्रपुरात काँग्रेसकडे २७ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे तीन नगरसेवक आधीच सोबत होते. त्यामुळे संख्याबळ ३० वर पोहचले होते. बसपही साथ देणार असल्याने एकूण आकडा ३१ वर पोहचला होता. मात्र एमआयएम तटस्थ राहिल्याने काँग्रेसला फटका बसला. एमआयएमकडे काँग्रेसने कधीही मदत मागितली नाही. ‘आमच्याकडे सदैव दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला’, असे एमआयएमचे नगरसेवक अजहर शेख यांनी सांगितले. यातच दिल्लीतील बैठकीत महापौरपद हे वडेट्टीवार आणि धानोरकर गटाकडे अडीच-अडीच वर्षे आधीच ठरवून घेण्यात आले. मित्रपक्षांचा कुठेही सहभाग नसल्याने काँग्रेसला फटका बसला.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा