Chandrapur Mayor Election Result : चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक २७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, मात्र सत्तास्थापनेसाठी हालचाली वाढल्या असतानाच काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद वाढला

काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक २७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. सत्तास्थापनेसाठी हालचाली वाढल्या असतानाच काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद वाढला. महापौरपदासाठी पक्षातून आपल्याच गटाला उमेदवारी मिळावी म्हणून दोन्ही नेते अडून बसले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मध्यस्थीनंतरही हा वाद संपत नसल्याचे दिसताच दिल्ली दरबारी जाऊन चर्चा करण्यात आली.
आदल्या दिवसापर्यंत एकमत होईना
दोन दिवसांच्या चर्चेनंतर महापौरपद धानोरकर गटाला तर उपमहापौरपद वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकाला देण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र महापौरपदासाठी चार अर्ज दाखल झाल्याने नेमक्या नावावर निवडणुकीच्या आदल्या दिवशीपर्यंत एकमत होऊ शकले नव्हते. तिकडे शिवसेना (उबाठा) महापौरपदावर कायम असल्याने सोमवारी वडेट्टीवार आणि केदार यांच्यात नागपुरात आघाडीच्या अनुषंगाने बैठक झाली. काँग्रेसचा महापौर होणार असे काँग्रेस विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस-ठाकरेसेना बैठका निष्फळ
शिवसेना (उबाठा)ही महापौरपद देणाऱ्यालाच पाठिंबा देणार असल्याचे सांगत असल्याने पेच निर्माण झाला होता. मंगळवारी सकाळी वडेट्टीवार आणि शिवसेना (उबाठा)चे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना (उबाठा)ने महापौरपदाची मागणी केली, मात्र काँग्रेसकडून त्यास नकार मिळाल्याने बैठक निष्फळ ठरली. नाराज झालेले गिऱ्हे बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर काही वेळातच भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा करण्यात आली. भाजपकडून महापौरपद देण्याची कबुली मिळाल्याने वेगळा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Nirmala Nawale : हा पराभव अनपेक्षित, माजी सरपंच निर्मला नवले यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, माझ्या नेतृत्वावर…
काँग्रेसमध्ये हे घडत असताना भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी वादावर पडदा टाकत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून काम सुरू केले. ‘पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. चर्चा पूर्ण झाली की लेखी स्वरूपात करार होणार असून भाजपचाच महापौर होणार’, असे मुनगंटीवार यांनी दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते.
Chandrapur : काँग्रेसला धक्का, चंद्रपूर महापालिकेत भाजप – शिवसेना ठाकरे गटाची युती
‘वंचित’ची चंद्रपूर कार्यकारिणी बरखास्त
महापालिकेतील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक गैरहजर राहिले. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी दिले आहे.
Pravin Tidme : उपमहापौरपद न मिळाल्यामुळे नाराज, नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा इशारा; एकनाथ शिंदे भेटून म्हणाले, ‘बंटीवर मी…’
चंद्रपुरात काँग्रेसकडे २७ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे तीन नगरसेवक आधीच सोबत होते. त्यामुळे संख्याबळ ३० वर पोहचले होते. बसपही साथ देणार असल्याने एकूण आकडा ३१ वर पोहचला होता. मात्र एमआयएम तटस्थ राहिल्याने काँग्रेसला फटका बसला. एमआयएमकडे काँग्रेसने कधीही मदत मागितली नाही. ‘आमच्याकडे सदैव दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला’, असे एमआयएमचे नगरसेवक अजहर शेख यांनी सांगितले. यातच दिल्लीतील बैठकीत महापौरपद हे वडेट्टीवार आणि धानोरकर गटाकडे अडीच-अडीच वर्षे आधीच ठरवून घेण्यात आले. मित्रपक्षांचा कुठेही सहभाग नसल्याने काँग्रेसला फटका बसला.

