भारतीय पुरूष संघ उपउपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था, नवी दिल्ली कॅनडामध्ये सुरू असलेल्या विश्व स्क्वॅश कनिष्ठांच्या सांघिक चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय पुरूष संघाने ब्राझील आणि नेदरलँड्स यांचा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मात्र महिलांच्या विभागात भारताला मलेशियाकडून हार पत्करावी लागली. कनिष्ठ पुरूषांच्या विभागातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात पाचव्या मानांकीत भारताने गट 5 मध्ये आघाडीचे स्थान मिळविले. भारतीय पुरूष संघाने नेदरलँड्सचा 3-0 असा पराभव…
