Pune Cyber Crime: काही हजारांचा मोह, जेलवारी नक्की! पुण्यात ‘म्युल अकाउंट’प्रकरणी 15 दिवसांत 60 जणांवर गुन्हे
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : काही हजार रुपये मिळतील, या मोहापायी स्वतःचे बँक खाते इतरांच्या वापरासाठी देणाऱ्या नागरिकांवर आता कायदेशीर कारवाईची कुऱ्हाड कोसळू लागली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अवघ्या १५ दिवसांत ‘म्युल अकाउंट’ प्रकरणात ६० जणांवर गुन्हे दाखल झाल्याने सायबर गुन्हेगारांनी शहरात उभारलेल्या आर्थिक लुटीच्या साखळीचे भीषण वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, यातील अनेकांना आपण…
