सांगली हादरली:अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा, झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीसह प्रियकरास अटक
प्रेमसंबंधात येणारा अडथळा दूर करण्यासाठी एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. हत्येनंतर हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र विश्रामबाग पोलिसांच्या सतर्कतेमुळे हत्येचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी पोलिसांनी मृत आनंदा सर्जे यांची पत्नी पल्लवी सर्जे आणि तिचा प्रियकर दीपक आजमाने…
