Headlines

शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार?:अंमलबजावणी अंतिम टप्प्यात, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात पैसे येणार




अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या राज्यातील बळिराजाला मुख्य प्रवाहा आणण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफी योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र शेतकरी बांधवांना थेट आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सततचा अवेळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा नव्या उमेदीने शेती करता यावी, यासाठी शासनाने ही योजना ‘नवसंजीवनी’ म्हणून आणली आहे. खरीप हंगामाच्या अगदी तोंडावर हा लाभ मिळणार असल्याने लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर; ‘अशी’ जाहीर होणार यादी या योजनेमध्ये कोणतीही दिरंगाई किंवा गैरव्यवहार होऊ नये, म्हणून ‘महाआयटी’च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा गोळा केलेला तपशील संगणकीय प्रणालीद्वारे पडताळला जात असून, अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. हे नाव शेतकऱ्यांना सहज पाहता यावे, यासाठी गाव चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित बँक शाखा, विकास सोसायट्या आणि ‘आपले सरकार सेवा केंद्रांवर’ या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. तसेच पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस (SMS) द्वारेही याची माहिती दिली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करणे शासनाने बंधनकारक केले आहे. यादीत नाव आल्यानंतर पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड किंवा यादीतील विशिष्ट क्रमांकासह नजीकच्या बँकेत किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ (CSC) जावे. तेथे बायोमेट्रिक पद्धतीने आपल्या कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. खात्याची आणि रकमेची खात्री करून शेतकऱ्याने मान्यता दिल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम थेट त्यांच्या खात्यात वर्ग होईल. OTS (एकवेळ समझोता) योजनेतील लाभार्थ्यांनी आधी स्वतःच्या हिश्शाची रक्कम भरणे आवश्यक आहे, त्यानंतरच शासनाची रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपले प्रमाणीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि त्रिसूत्री ही योजना केवळ सरसकट कर्जमाफी नसून सर्व स्तरांतील शेतकऱ्यांचा विचार करून तिची अत्यंत अभ्यासपूर्ण आखणी करण्यात आली आहे. या योजनेत प्रामुख्याने तीन टप्पे आहेत:



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत