Satara 8 friends tragically lost their lives in ambenali ghat car accident mahesh pawar birthday emotiona status; “वाढदिवशीच देवाने तुम्हाला बोलावून घेतले, तुमची खूप आठवण येईल”; साताऱ्यातील तरुणांसाठी मित्रांच्या स्टेट्सने डोळ्यात पाणी
सुधीर पाटील, सातारा : कोकण पर्यटनावरून परत येताना स्कार्पिओ गाडी आंबेनळी घाटातील दरीत कोसळून 8 तरूणांचा जागीच अंत झाला. या भीषण अपघातात मृत्यू झालेले सगळे एकमेकांचे जीवलग मित्र होते. महेश पवार याचा रविवारी वाढदिवस होता. मात्र, वाढदिनीच ‘बर्थे डे’ बॉयसह त्याच्या मित्रांवर नियतीने घाला घातला. आसगावातील बाकीच्या मित्रांना महेशचा वाढदिवस साजरा करायचा होता, पण काळाने…
