Headlines

Mumbai Manhole Accident Aslam Shaikh dies after falling Family demands justice Crime News; पैशांनी आमचा माणूस परत येणार का? मॅनहोल दुर्घटनेतील अस्लम शेखच्या कुटुंबाचा उद्रेक, पित्याचा फोटो दाखवत संतप्त सवाल

Mumbai Manhole Accident : कितीही पैसे दिलेत तरी आमचा माणूस परत येणार आहे का, अशा शब्दात मॅनहोल दुर्घटनेतील मयत अस्लम शेख यांच्या कुटुंबीयांनी उद्रेक व्यक्त केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शालेय बसवर झाड पडून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची चेंबूर येथील घटना ताजी असतानाच कुर्ला साकीनाका येथे खैरानी मार्ग परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा…

Read More

Palghar Rain: दुर्दैवी! घरात साचलेलं पाणी बाहेर काढताना अचानक भिंत कोसळली, 47 वर्षीय महिलेचा करुण अंत – palghar district heavy rain 47 yrs old woman dies after house wall collapsed

Palghar Rain: राज्यात सर्वत्र तीन दिवसांपासून संततधार सुरु आहे. पालघरमध्ये घराची भिंत अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. एक तरुण नदीपात्रात बुडाला, तर एक जण बेपत्ता आहे. पालघर पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, पालघर : जिल्ह्यात गुरुवारी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून, सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच सलग तीन दिवस सुरू असलेल्या…

Read More

जीवघेण्या हल्ल्यातील आरोपींना अटक न झाल्याने रस्ता रोको:माळीबाभूळगाव ग्रामस्थांचे उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन‎

माळीबाभूळगाव येथील युवकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी बुधवारी पाथर्डी–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर माळीबाभूळगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. माळीबाभूळगाव येथील रहिवासी अक्षय रमेश भडके यांच्यावर २९ मे रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात…

Read More

Women Farmer Bill: विनासातबाराही शेतकरी प्रमाणपत्र; महिला शेतकरी विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी, तरतुदी काय? – maharashtra assembly on 2 jully unanimously passed maharashtra women farmers empowerment bill 2026

मुंबई : शेती आणि संलग्न कार्यात सहभागी असलेल्या महिलांना शेतकरी म्हणून मान्यता देणारे ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक ’ गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. शेतीच नव्हे तर पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन तसेच इतर शेती संलग्न व्यवसायात असलेल्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी दर्जा मिळणार आहे. महिलेच्या नावावर सातबारा नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे…

Read More

दुर्घटना:मुंबईत मॅनहोलमध्ये पडल्याने वृद्धाचा मृत्यू, उघड्या मॅनहोलप्रकरणी मुंबई मनपाच्या 4 अधिकाऱ्यांचे निलंबन

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसराला गुरुवारी अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, राज्यातील हा पावसाचा प्रभाव आगामी ७ जुलैपर्यंत कायम राहणार आहे. दरम्यान, मुंबईत गुरुवारी सकाळपर्यंत २४ तासांत ९ इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली. साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी बृहन्मुंबई…

Read More

रामद्रोह म्हणजेच देशद्रोह:श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरे सेना आक्रमक, राज्यभरातील मंदिरांमध्ये 'रामरक्षा महाआरती'चे आयोजन

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीच्या आर्थिक गैरव्यवहार आणि लुटीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख राम आणि हनुमान मंदिरांमध्ये ‘रामरक्षा महाआरती’ आयोजित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे गट सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. श्रीराम मंदिर उभारणीत…

Read More

मेळघाटात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'चा यशस्वी प्रयोग:बोअरवेलला नवसंजीवनी; घराच्या छतावरील पाणी थेट भूजलात

मेळघाटातील अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा एक यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. घराच्या छतावरून वाहून जाणारे पाणी थेट भूजलात पोहोचवल्याने एका बोअरवेलला नवसंजीवनी मिळाली आहे. धारणी शहरातील एका शासकीय कर्मचाऱ्याने हा जलसंधारणाचा आदर्श घालून दिला आहे. मेळघाटात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई, कोरड्या पडणाऱ्या बोअरवेल्स आणि घटत्या भूजल पातळीची…

Read More

मोर्शीत परळ सापासह 39 पिल्ले आढळली:जीवनसेतू व कार्स संस्थेने केली यशस्वी सुटका

मोर्शीतील समर्थ कॉलनीमध्ये रूपेश उज्जैनकर यांच्या घरी परळ जातीचा साप आणि त्याची तब्बल ३९ पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली. जीवनसेतू जलमित्र आपत्ती बचाव बहुउद्देशीय संस्था आणि कार्स संस्थेच्या सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून साप आणि त्याच्या पिल्लांची यशस्वी सुटका केली. ही घटना गुरुवार, २ जुलै रोजी सकाळी घडली. उज्जैनकर कुटुंब नेहमीच्या घरगुती कामात व्यस्त असताना त्यांना…

Read More

4 जुलै रोजी घडणार 'अपसूर्य' खगोलीय घटना:पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर जाणार, अंतर 15.21 कोटी किमी राहील

शनिवार, ४ जुलै रोजी एक विशेष खगोलीय घटना घडणार आहे. या दिवशी पृथ्वी सूर्यापासून तिच्या कक्षेतील सर्वात जास्त अंतरावर असेल. खगोलशास्त्रात या स्थितीला ‘अपसूर्य’ असे म्हटले जाते. मराठी विज्ञान परिषदेचे खगोल अभ्यासक विजय गिरुळकर आणि प्रवीण गुल्हाने यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या मते, पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार आहे. यामुळे वर्षभरात एकदा…

Read More

प्रहार'ची स्मार्ट मीटरविरोधात निदर्शने:विद्युत भवनवर धडक; अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर, मोहीम थांबवण्याची मागणी

अमरावती येथे महावितरणच्या स्मार्ट मीटरविरोधात ‘प्रहार’ संघटनेने गुरुवारी तीव्र निदर्शने केली. स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबवून जुने मीटर पुन्हा बसवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कॅम्प येथील विद्युत भवनसमोर हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या मते, महावितरण कंपनीकडून घराघरांत बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरमुळे कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे….

Read More