Mumbai-Nagpur Highway Accident: मलकापूर – मुक्ताईनगर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले आहेत.

एमएच २८ एझेड ३२५९ क्रमांकाचे हडंबा थ्रेशर ट्रॅक्टर गुरुवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास शेताकडे जात होते. या ट्रॅक्टरला तालसवाडा ते दसरखेडदरम्यान आरजे २९ जीबी ५६७६ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने मागेहून जोरदार धडक दिली. यामुळे ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
Bacchu Kadu Joins Shivsena: महायुतीची नवी गणिते! बच्चू कडूंच्या शिवसेना प्रवेशाने होणार बदल; भाजपच्या गोटात अस्वस्थता
अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टरचा मागील भाग पूर्णतः चुराडा झाला. गंभीर जखमींना तातडीने मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे, एएसआय विजय टेकाडे, गजानन बावस्कर, राजू साठे, बंटी कोलते, संदेश शिंदे, नीलेश बोंडे आणि अश्विन साठे यांनी मदतकार्य करीत जखमींना दवाखान्यात हलविले. अपघातात ठार झालेले बाळकृष्ण पाचपोर यांना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढावे लागले. अपघातानंतर अंधाराचा फायदा घेत ट्रकचालक व वाहक फरार झाले.
Buldhana Bride Death: संसाराचं स्वप्न अधुरेच! प्री-वेडिंग शूटनंतर आजारी पडलेल्या तरुणीचा मृत्यू; 3 मे रोजी होता लग्नसोहळा
बुलेट दुभाजकावर धडकली; तरुण ठार, दोघे जखमी
बुलढाणा : लग्नाला जात असलेल्या तरुणांची भरधाव वेगातील बुलेट दुभाजकावर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला; तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास चिखली ते जालना मार्गावर अंढेरा फाट्याजवळ घडली. ओम संजय जामदार (वय २०) असे मृताचे, तर जय जामदार व अभी भवर अशी जखमींची नावे आहेत.
ओमसह जय जामदार व अभी भवर असे तिघेजण गुरुवारी दुपारी चिखली येथून बुलेटने जालना जिल्ह्यातील अंबड येथे एका लग्न समारंभासाठी निघाले. साडेबारा वाजताच्या सुमारास अंढेरा फाटा परिसरात नियंत्रण सुटून बुलेट दुभाजकावर जोरात धडकली. यात तिघेही दूर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. यातील ओम याचा जागीच मृत्यू झाला. तर, जय व अभी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

