Headlines

Buldhana Accident: मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, 2 मजुरांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर


Mumbai-Nagpur Highway Accident: मलकापूर – मुक्ताईनगर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले आहेत.

buldhana accident
बुलढाणा अपघात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, बुलढाणा: भरधाव वेगातील ट्रकने थ्रेशर ट्रॅक्टरला धडक दिल्याने दोन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात मलकापूर – मुक्ताईनगर मार्गावर हॉटेल महाराजा रेस्टॉरंटसमोर गुरुवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास झाला. बाळकृष्ण त्र्यंबक पाचपोर (वय ५०, रा. धरणगाव) व रोहन किसन पाटील (वय २६), अशी मृतांची नावे आहेत. तर, राजू नेरकर (वय ५०), मंगेश विकास पाटील (वय ३०) आणि आकाश रामचंद्र सोनटक्के (वय २८) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

एमएच २८ एझेड ३२५९ क्रमांकाचे हडंबा थ्रेशर ट्रॅक्टर गुरुवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास शेताकडे जात होते. या ट्रॅक्टरला तालसवाडा ते दसरखेडदरम्यान आरजे २९ जीबी ५६७६ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने मागेहून जोरदार धडक दिली. यामुळे ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Maharashtra TimesBacchu Kadu Joins Shivsena: महायुतीची नवी गणिते! बच्चू कडूंच्या शिवसेना प्रवेशाने होणार बदल; भाजपच्या गोटात अस्वस्थता
अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टरचा मागील भाग पूर्णतः चुराडा झाला. गंभीर जखमींना तातडीने मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे, एएसआय विजय टेकाडे, गजानन बावस्कर, राजू साठे, बंटी कोलते, संदेश शिंदे, नीलेश बोंडे आणि अश्विन साठे यांनी मदतकार्य करीत जखमींना दवाखान्यात हलविले. अपघातात ठार झालेले बाळकृष्ण पाचपोर यांना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढावे लागले. अपघातानंतर अंधाराचा फायदा घेत ट्रकचालक व वाहक फरार झाले.

Maharashtra TimesBuldhana Bride Death: संसाराचं स्वप्न अधुरेच! प्री-वेडिंग शूटनंतर आजारी पडलेल्या तरुणीचा मृत्यू; 3 मे रोजी होता लग्नसोहळा
बुलेट दुभाजकावर धडकली; तरुण ठार, दोघे जखमी
बुलढाणा :
लग्नाला जात असलेल्या तरुणांची भरधाव वेगातील बुलेट दुभाजकावर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला; तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास चिखली ते जालना मार्गावर अंढेरा फाट्याजवळ घडली. ओम संजय जामदार (वय २०) असे मृताचे, तर जय जामदार व अभी भवर अशी जखमींची नावे आहेत.

ओमसह जय जामदार व अभी भवर असे तिघेजण गुरुवारी दुपारी चिखली येथून बुलेटने जालना जिल्ह्यातील अंबड येथे एका लग्न समारंभासाठी निघाले. साडेबारा वाजताच्या सुमारास अंढेरा फाटा परिसरात नियंत्रण सुटून बुलेट दुभाजकावर जोरात धडकली. यात तिघेही दूर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. यातील ओम याचा जागीच मृत्यू झाला. तर, जय व अभी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा