Headlines

Builder Buyer Agreement; बिल्डर-खरेदीदार करार करताना नीट वाचा, फायदा होण्यापेक्षा होईल मोठे नुकसान! कोणती काळजी घ्यावी वाचा


Builder Buyer Agreement: एक आश्वासन दिलं अन् काहीतरी वेगळंच मिळालं… मालमत्ता खरेदी केल्यानंतर बिल्डर आणि खरेदीदार या दोघांमध्ये फसवणुकीची प्रकरणे सर्रास घडतात. यामागंचे प्रमुख कारण म्हणजे की खरेदीदाराला करार नीट समजलेला नसतो, असं तज्ञांचे म्हणणे आहे.भविष्यात कोणतीही अडचण टाळायची असेल, तर घर खरेदी करताना Builder-Buyer Contract मध्ये लिहिलेल्या अटी व शर्ती नीट समजून घ्या.

Builder Buyer Agreement Details
बिल्डर-खरेदीदार करार म्हणजे काय? विकासकामासाठी जमीन देताना काळजी घ्या!
Real Estate News: बिल्डर बायर ॲग्रीमेंट किंवा BBA म्हणजे काय? आणि घर खरेदीदारांसाठी महत्त्वाचे का आहे? बिल्डर बायर ॲग्रीमेंट एक कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्यामध्ये मालमत्तेच्या खरेदीच्या वेळी बिल्डर आणि खरेदीदार यांच्यातील सर्व अटी व शर्ती नमूद केलेल्या असतात. हा दस्तऐवजी खूप महत्त्वाचा असतो ज्यामध्ये फ्लॅटची किंमत, पेमेंटची पद्धत, ताबा मिळण्याची तारीख, पार्किंग आणि इतर सुविधांचा तपशील, तसेच विलंबासाठी लागणाऱ्या दंडाचा स्पष्ट उल्लेख केलेला असतो. RERA कायद्यानुसार BBA करार बिल्डर आणि खरेदीदार यांना हक्क आणि संरक्षण प्रदान करतो.

मालमत्ता खरेदी करताना हलगर्जीपणा करू नका!

घर, फ्लॅट किंवा मालमत्ता खरेदीचा निर्णय प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आर्थिक निर्णय असतो. यासाठी सर्वसामान्य लोक बँकेकडून कर्ज घेतात, अगदी आपल्या आयुष्यभराची बचतही पणाला लावतात. पण, अनेक खरेदीदार BBA करारातील अटी व शर्ती पूर्णपणे न समजता त्यावर सही करतात ज्यामुळे नंतर घराचा ताबा मिळण्यास विलंब, छुपे शुल्क, पार्किंगच्या जागेच्या समस्या, बांधकामाच्या गुणवत्तेतील समस्या, करार रद्द केल्याबद्दल दंड आणि परताव्याच्या समस्या यांसारख्या अडचणींना सामोरे जावे लागते.

Maharashtra TimesIndian Taxpayer Viral Post : 26,600 रुपयांच्या डिव्हिडंटवर 26,300 रुपये टॅक्स-व्याज, महिला म्हणते- ‘आता 300 रुपयांचं काय करू?’
अशा परिस्थितीत, तुम्ही घर खरेदी करणार असाल तर भविष्यातील संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी हा करार समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. बिल्डर-खरेदीदार करार म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय? खरेदीदारांनी करारातील कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे आणि RERA कायदा खरेदीदारांना कशी मदत करतो? समजून घेऊया.

बिल्डर-खरेदीदार करार म्हणजे काय?

बांधकामाधीन असलेल्या मालमत्तेच्या खरेदीदरम्यान BBA करार रिअल इस्टेट डेव्हलपर आणि घर खरेदीदार यांच्यात केला जातो. या करारामध्ये मालमत्तेचा तपशील, पेमेंटच्या पद्धती, ताबा मिळण्याची वेळ, बांधकामाचा तपशील, पार्किंगचे वाटप, विलंबासाठी दंड, करार रद्द करण्याचे नियम आणि दोन्ही पक्षांचे हक्क व जबाबदाऱ्या यासंख्या गोष्टी नमूद केलेल्या असतात. एकदा स्वाक्षरी केल्यास संपूर्ण करार कायदेशीर ठरतो आणि रेराच्या नियमानुसार बिल्डर कराराशिवाय खरेदीदारांकडून मालमत्तेच्या किमतीच्या 10% पेक्षा जास्त शुल्क आकारू शकत नाहीत.

Maharashtra Timesआता बचतही होणार अन् फायदाही; HDFC बँकेने महिला आणि जेष्ठ नागरिकांसाठी आणली विशेष स्कीम

BBA कराराचे महत्त्व काय?

घर किंवा फ्लॅट खरेदी करताना बहुतेक लोक फ्लॅटची किंमत, सवलती, ईएमआय ऑफर्स आणि सुविधा यांवर लक्ष केंद्रित करतात. पण यासोबतच हा करार पूर्णपणे समजून घेण्यावरही तज्ञ जोर देतात, कारण कोणताही वाद निर्माण झाल्यास न्यायालये आणि रेरा कायदे केवळ नोंदणीकृत करार, कराराच्या अटी आणि इतर अधिकृत कागदपत्रांचाच विचार करतात. त्यामुळे करारामध्ये एखादी गोष्ट स्पष्ट नमूद केलेली नसल्यास नंतर सिद्ध करणे कठीण होऊ शकते.

करारातील कोणत्या अटींकडे खरेदीदारांनी विशेष लक्ष दिले पाहिजे?

  • घर, फ्लॅटचा ताबा मिळण्याची तारीख
  • कार्पेट एरिया आणि सुपर बिल्ट-अप एरिया
  • देयकाचे वेळापत्रक
  • पार्किंगची जागा
  • प्रकल्पाला विलंब झाल्यास दंड
  • कॅन्सलेशन आणि परतावा धोरण
  • बांधकामाचा तपशील
  • फोर्स मेज्योर कलम

Maharashtra Times12 वर्ष जुना पीएफचा मोठा नियम बदलला; आता 25 हजारांपर्यंत ‘बेसिक’ असणाऱ्यांनाही पेन्शन, कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

फोर्स मेज्योर कलम काय असतो?

बांधकाम व्यावसायिक अनेकदा करारात फोर्स मेज्योर कलम जोडतात, ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, सरकारी मंजुरीस विलंब किंवा बांधकाम साहित्याची कमतरता यांसारख्या परिस्थितींचा समावेश असतो. अशा प्रकरणांत बांधकाम व्यावसायिक प्रकल्पास विलंब करण्याचे समर्थन करू शकतो, पण कलम खूप व्यापक नसावे हे खरेदीदारांनी सुनिश्चित केले पाहिजे जेणेकरून ताबा मिळण्यास मोठ्या विलंबाचे समर्थन करण्यासाठी याचा अनेकदा वापर केला जातो.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा