Headlines

Bombay High Court slams FDA Tukaram Mundhe over licence suspend of Amazon Bhiwandi Godown Crime News; तलवारीने डास मारल्यासारखं करु नका, हायकोर्टाच्या FDA ला कानपिचक्या; आधी प्रशंसा केलेय, पण कायदेशीर प्रक्रियेचं काय?


Bombay High Court slams FDA : अन्न व औषध प्रशासनाकडून चांगले व प्रशंसनीय काम सुरू असल्याचे आम्ही यापूर्वीही म्हटलेले आहे. मात्र कोणतीही कारवाई कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे करा, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला फटकारले.

Tukaram Mundhe Bombay High Court Maharashtra Times
तुकाराम मुंढे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) चांगले व प्रशंसनीय काम सुरू असल्याचे आम्ही यापूर्वीही म्हटलेले आहे. परंतु, काही प्रकरणांत कारवाई करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन होत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. अपिल कालावधीदरम्यान कारवाई करता येत नाही, हा कायद्याचा प्रस्थापित सिद्धांत असूनही या प्रकरणात परवाना रद्द करण्याचा आदेश कसा काढला? हे म्हणजे तलवारीने डास मारल्यासारखे आहे. असे करू नका. जी काही कारवाई करायची आहे ती कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे करा’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला शुक्रवारी पुन्हा एकदा कानपिचक्या दिल्या.

भिवंडी गोदामाचा परवाना रद्द

अन्न सुरक्षा नियमांनुसार मुदत संपलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावली नसल्याच्या कारणावरून अॅमेझॉन रिटेल इंडियाच्या भिवंडीमधील गोदाम बंद करून गोदामाचा परवाना एफडीएच्या अधिकाऱ्यांनी रद्द केला. त्याला आव्हान देणारी याचिका या कंपनीने केली आहे. याविषयी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली.

Maharashtra TimesCrime News : ग्लुकोज ड्रिपमधून पतीला विष, प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओने महिला गोत्यात, मृत्यूच्या तीन महिन्यांनी बॉडी बाहेर काढण्याची वेळ‘अधिकाऱ्यांनी २४ जून रोजी गोदामाची पाहणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोणतीही सुधारणा नोटीस न देता गोदामाचा परवाना निलंबित केला. त्यानंतर आम्ही कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिले आणि कायद्यातील तरतुदीप्रमाणे अपिलही केले. ते प्रलंबित असतानाच परवाना रद्दचा आदेशही काढण्यात आला. गोदामातील मुदत संपत असलेल्या अन्य पदार्थांची विल्हेवाट लावण्यासही आम्हाला परवानगी दिली नाही’, असे कंपनीने ज्येष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांच्यामार्फत खंडपीठाच्या निदर्शनास आणले.

Maharashtra TimesVikhroli Crime : घरात जाल, तर माझ्यावर अतिप्रसंग करताय म्हणून ओरडेन; विक्रोळीत बापलेकाला संपवलं, जावेने धमकावलं, पण शेजाऱ्यांनी ट्रिक वापरुन पकडलं

तलवारीने डास मारल्यासारखे आहे

याविषयी खंडपीठाने एफडीएकडे विचारणा केली असता, अनियमितता आढळल्यास काही ना काही कारवाई करणे आवश्यक आहे, असे म्हणत प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यासाठी मुदत देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. त्यावर, ‘तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. परंतु, कायदेशीर प्रक्रियेचे काय? एफडीएच्या मोहिमेची आम्ही यापूर्वीच प्रशंसा केलेली आहे. परंतु, अपिल कालावधीत कारवाई करायची नसल्याचा प्रस्थापित कायदेशीर सिद्धांत असताना परवाना रद्द कसा केला? अशाप्रकारे कारवाई करून मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आदी शहरांतील सर्व व्यवसायिक आस्थापने बंद करणार का? हे म्हणजे तलवारीने डास मारल्यासारखे आहे’, अशा शब्दांत खंडपीठाने उपरोधिक टोला लगावला. अखेरीस एफडीएला उत्तर देण्यासाठी मुदत देऊ पुढील सुनावणी सोमवार, १० ऑगस्ट रोजी ठेवली.