Bollywood Director Shakeel Noorani Arrest For Actress Assault ;Shakeel Noorani Arrest : कामाच्या नावे अभिनेत्रीला घरी बोलावून गैरफायदा, गुंगीचं औषध देऊन काढले व्हिडिओ ; 73 वर्षीय प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक
Bollywood Director Shakeel Noorani Arrest For Actress Assault ;Shakeel Noorani Arrest : कामाच्या नावे अभिनेत्रीला घरी बोलावून गैरफायदा, गुंगीचं औषध देऊन काढले व्हिडिओ ; 73 वर्षीय प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक
Bollywood Director Assault Actress : मनोरंजन इंटस्ट्रीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका प्रसिद्ध दिग्दर्शकानेच अभिनेत्री घरी बोलवून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्रींना पैशांसाठी किंवा कामासाठी दबाव आणून त्यांच्याकडे लैंगिक मागणी केली जाते. आता पर्यत असे अनेक प्रकार समोर आले आहेत. पूर्वी कलाकार हे असे प्रकार घडल्यानंतर मूग गिळून गप्प बसायचे पण नंतर कलांतराने काहींनी आवाज उठवायला सुरुवात केली. मग या मी टू चळवळीत सहभागी होऊन अनेक कलाकार त्यांचे अनुभव सांगू लागले.
आता मनोरंजन विश्वातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘जोरू का गुलाम’सारख्या अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक शकील नूरानी यांना मुंबईतील मालवणी पोलिसांनी लैंगिक छळाच्या एका प्रकरणात अटक केली आहे. 33 वर्षीय एका अभिनेत्रीने 73 वर्षांचे दिग्दर्शक नूरानी यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप करत मालवणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
‘बडे दिलवाला’ (1999) आणि ‘जोरू का गुलाम’ (2000) यांसारख्या चित्रपटांचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन करणाऱ्या शकील नूरानी यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. एका चित्रपट प्रोजेक्टबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने त्यांनी आपल्या निवासस्थानी तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, दिग्दर्शक शकील नूरानी यांनी एका 33 वर्षीय अभिनेत्रीला आगामी चित्रपट प्रोजेक्टवर चर्चा करण्यासाठी मालवणी येथील आपल्या घरी बोलावले होते. तिथे त्यांनी त्या महिलेचा लैंगिक छळ केला आहे. या प्रकरणात त्या महिलेला गुंगीचे औषध देणे आणि त्यानंतर एका कथित व्हिडिओचा वापर करून तिला धमकावणे, असे आरोपही करण्यात आले आहेत.
मालवणी पोलिसांनी शकील नूरानी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 64(2)(M), 123, 351(2) आणि 88 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अटकेनंतर, मालवणी पोलिसांनी त्यांना बोरीवली येथील हॉलिडे कोर्टमध्ये हजर केले; न्यायालयाने त्यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शकील नूरानी यांची कारकीर्द आणि चित्रपट
शकील नूरानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत; त्यांनी 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विष्णू देवा’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी ‘बडे दिलवाला’ (1999) या चित्रपटाद्वारे पटकथा लेखक पासून सुरुवात केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही त्यांनीच केली होती. त्यांनी गोविंदा आणि ट्विंकल खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला ‘जोरू का गुलाम’ हा चित्रपटही दिग्दर्शित केला; 2000 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट यशस्वी ठरला होता. याव्यतिरिक्त, नूरानी यांनी 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब: द ॲसिड ऑफ लव्ह’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा