Headlines

Body of woman found under nashik bridge fear spreads in the area; सुटकेसमधून उग्र वास आला, उघडताच महिलेची बॉडी आढळली; नाशिकमधील घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण


Crime News: मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे.

crime news
सुटकेसमधून उग्र वास आला, उघडताच महिलेची बॉडी आढळली(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : नाशिकच्या कन्नमवार पुलाखाली एका काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे आणि पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच फॉरेन्सिक टीम व श्वान पथक दाखल झाले असून, याबाबत अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी ९ ते ९:३० या दरम्यान कन्नमवार पुलाच्या खाली रस्त्याच्या कडेला सफाई कर्मचाऱ्यांना काम करत असताना एका सुटकेसमधून उग्र वास आला. हा वास अतिशय तीव्र असल्याने आणि संशय बळावल्याने या सफाई कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर तात्काळ आडगाव पोलिस ठाण्याचे बीट मार्शल यांनी घटनास्थळी पोहोचून याबाबत शहानिशा केली असता सदर सुटकेसमध्ये मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबतच श्वान पथक, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा सुरू केला.

सुटकेसमधील मृतदेह हा बाहेर काढला असता सदर मृतदेह हा एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात महिलेचा असल्याच निष्पन्न झाले. सदर महिलेसोबत घातपात झाल्याचा संशय पोलिसांना असून आता त्या दिशेने पोलिस अधिक तपास करत आहे. हा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवालातून आणखी माहिती समोर येणार आहे.

दरम्यान, या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण पसरलं आहे. मृतदेहाची ओळख पटू नये, तसंच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरण्यात आला आणि नंतर कन्नमवार पुलावरून गोदावरी नदीत फेकण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा