Headlines

BMC Mayor Ritu Tawade First Reaction on Tree Collapsed on School Bus in Chembur 11 Road


Mumbai Rain Chembur Tree Collapse : मुंबईच्या चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर 10 मुलं जखमी झाले आहेत. या घटनेनंतर रितू तावडे यांनी भावूक करणारी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या घटनेनंतर त्यानी घटनास्थळी जावून पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा देखील इशारा दिला आहे.

Ritu Tawade
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईत मन हेलावणारी घटना घडली आहे. स्कूल बसमधून शाळेत जाणाऱ्या मुलांवर काळाने घाला घातला आहे. चेंबूरच्या 11 नंबरच्या रोडवर एक झाड या बसवर कोसळलं. या दुर्घटनेत 10 विद्यार्थी जखमी झाले. एका विद्यार्थ्याचा या घटनेत मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे मुंबईत आता कुठे पावसाला सुरुवात झाली आहे. खूप प्रतिक्षेनंतर पाऊस येत आहे. पण पाऊस सुरु होताच या दुर्दैवी घटनेने मुंबईकरांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलं आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी आपला मुलांना शाळेत शिक्षणासाठी पाठवलं, आपल्या या मुलांच्या उज्ज्वल भविष्याबाबत स्वप्न पाहिली आज त्याच मुलांचा असा अपघात होणं हे अनपेक्षित आहे. या मुलांच्या आई-वडिलांना आज सावरणं कठीण आहे. ज्या विद्यार्थ्याने या दुर्घटनेत जीव गमावला आहे, त्याच्या आई-वडिलांची झालेली हानी कधीही भरुन काढता येणार नाही. या दुखद घटनेमुळे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी भावूक करणारी प्रतिक्रिया दिली आहे.

रितू तावडे यांची भावनिक प्रतिक्रिया

“अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला खूप वाईट वाटत आहे. महापौर नाही तर एक आई या नात्याने सुद्धा मला वाईट वाटत आहे. एक बाळ तिथे अडकून पडलेलं आहे. त्याला रेस्क्यू करण्याचे काम चालू आहे. मी सुद्धा त्या ठिकाणी निघतेय”, अशी भावनिक प्रतिक्रिया रितू तावडे यांनी घटनेनंतर दिली.

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या चेंबूर येथे 11 नंबर रोडवर मोठी दुर्घटना घडली आहे. एका शाळेच्या बसवर झाड उन्मळून पडलं आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर 10 विद्यार्थी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच एक विद्यार्थी हा बसमध्ये अडकला आहे. त्याला बसमधून बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. या

घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. महापौर नाही तर आई म्हणून खूप वाईट वाटत आहे. एक बाळ अडकून पडलं आहे. मी घटनास्थळी जात आहे, असं रितू तावडे यांनी सांगितलं. यानंतर रितू तावडे या घटनास्थळी दाखल झाल्या.

mumbai news

रितू तावडे आणखी काय म्हणाल्या?

“अतिशय दुर्देवी घटना घडली आहे. युनिव्हर्सल स्कूलची ही बस होती. ही बस मुलांना शाळेत घेऊन जात होती. पण चेंबूरच्या 11 नंबरच्या रस्त्यावर बसवर झाड कोसळलं आहे. बसमध्ये जवळपास 13 विद्यार्थी होते. त्यापैकी 12 विद्यार्थ्यांना बाहेर काढलं आहे. 1 विद्यार्थी अडकून पडलेला आहे. बाकीचे विद्यार्थी देखील जखमी झालेले आहेत. एकाचे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, पालिका कर्मचारी दाखल झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केलं जात आहे. मी स्वत: घटनास्थळाच्या दिशेला निघाली आहे”, असं रितू तावडे यानी सांगितलं.

पालिका प्रशासनाकडून माहिती घेतली की, त्या भागातील झाडांची ट्रिमिंग झाली होती का? तर त्या रस्त्यावर झाडांचे ट्रिमिंग झाले होते. पण ही बस जात असताना झाड कोसळणं ही खूप दुर्दैवी घटना आहे”, असं रितू तावडे म्हणाल्या.

‘झाडांचे ट्रिमिंग झाले होते’

“मी पावसाळ्याआधी शंभर टक्के आढावा घेतला होता. मी स्वत: रिव्ह्यू मीटिंग घेतल्या होत्या. मुंबईतील जेवढी झाडे आहेत त्याचे सर्वेक्षण करा, किती वर्षांपासूनची झाडे आहेत, आता त्यांची काय परिस्थिती आहे, याबाबत सविस्तर माहिती घेतली होती. मी माझ्या स्तरावर सर्व अधिकाऱ्यांना दिले होते. ट्रिमिंग पूर्ण झाले होते. तरीही झाड कोसळल्याची घटना घडली आहे. मी आता घटनास्थळी जावून माहिती घेते”, अशी प्रतिक्रिया रितू तावडे यांनी दिली.

mumbai news

रितू तावडेंचा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संबंधित झाड उन्मळून पडू शकतं. त्यामुळे याबाबात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती स्थानिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली होती, अशी तक्रार स्थानिकांनी रितू तावडे यांच्याकडे केली आहे. स्थानिकांच्या या तक्रारी खऱ्या असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, असा इशारा रितू तावडे यांनी दिला आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा