Headlines

Birthday Party Held in Presence of Gangster in Satara Zilla Parishad office


सातारा जिल्हा परिषदेची एक परंपरा राहिलेली आहे. पण जिल्हा परिषदेत काही अनपेक्षित घटना घडत आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. कारण यावेळी जिल्हा परिषदेत तडीपार गुंडाच्या उपस्थितीत बर्थडे पार्टी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Satara ZP
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : जिल्हा परिषदेत तडीपार गुंडाच्या उपस्थितीत बर्थडे पार्टी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समाज कल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे यांनी आपल्या केबिनमध्ये तडीपार गुंडाच्या उपस्थितीत मित्राच्या वाढदिवसाचा केक कापल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तडीपार गुंड खुलेआम फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहे.

सातारा जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवेळी झालेल्या राड्याची चर्चा अजूनही सुरू आहे. आता तर तडीपार गुंडाच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या लौकिकाला पुन्हा डाग लागला आहे. समाज कल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे यांनी केबिनमध्ये शंभू साळुंखे या मित्राच्या वाढदिवसाचा केक तडीपार गुंड बिऱ्या ऊर्फ अमित कदम याच्या उपस्थितीत कापला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

सातारा जिल्हा परिषदेला मोठा राजकीय वारसा आहे. अनेक दिग्गजांनी झेडपीचे नेतृत्व केले आहे. आज अखेर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेवर जिल्हा परिषदेचं राजकारण सुरू होतं. मात्र, यंदाच्या निवडणुकीत यशवंत विचाराला गालबोट लागले. सत्तेसाठी आमदार, मंत्र्यांची झोंबाझोंबी, पोलिसांकडून मंत्र्यांना धक्काबुक्की झाली. त्या राड्यामुळे सातारा जिल्हा परिषदेची राज्यभर शोभा झाली असताना त्याच जिल्हा परिषदेत एका तडीपार गुंडाच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

भाजपने सर्व भेदांचा अवलंब करून झेडपीची सत्ता मिळवली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषदेत तडीपार गुंडांना थेट पदाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये प्रवेश मिळतो. परंतु, सामान्य लोकांना पदाधिकारी भेटतात का? हा संशोधनाचा विषय आहे. दरम्यान, तडीपार गुंडाच्या उपस्थितीत झालेल्या बर्थडे पार्टीनंतर आता खुलेआम फिरणाऱ्या तडीपार गुंडांच्या पोलीस मुसक्या आवळणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

ऋषिकेश धायगुडे यांचा खुलासा काय?

जिल्हा परिषदेत झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर समाज कल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, “मी जिल्हा परिषदेतील माझ्या केबिनमध्ये असताना माझे मित्र शंभू साळुंखे हे माझ्या कार्यालयात आले. आम्ही शंभू याच्या वाढदिवसाचा केक कापला. त्यांच्यासोबत कोण आहे, याची मला कोणतीही कल्पना नव्हती. हे सर्व अनावधानाने झाले आहे.” सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा