Headlines

Bhuleshwar Cha Raja Ganesh Idol Accident Lalbaug Cha Raja Mandal helps Sanket Nevshe Brijesh Joshi Family; ‘भुलेश्वरचा राजा’ गणेश मंडळावर ‘लालबागचा राजा’चं वडिलकीचं छत्र, नेवशे-जोशी कुटुंबीयांना मदतीचा हात, मंडळाला 11 लाखांचा निधी


Sanket Nevshe Death : भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती दुर्घटनाग्रस्त होऊन दोन गणेशभक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे मंडळावर शोककळा पसरली असतानाच भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे ११ लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे.

Bhuleshwar cha Raja Ganesh Idol Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ ही मुंबईतील २२ फूट उंच गणेश मूर्ती आगमन मिरवणूक सुरु असताना कोसळून झालेल्या अपघातात मंडळाचे सचिव आणि कार्यकर्त्याला प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर ‘ लालबागचा राजा ‘ गणेशोत्सव मंडळाने ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशोत्सव मंडळावर वडिलकीचं छत्र धरलं आहे. मंडळाला ११ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे, तर दिवंगत तरुणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

कुटुंबीयांना मदतीचा हात

भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती दुर्घटनाग्रस्त होऊन दोन गणेशभक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे मंडळावर शोककळा पसरली आहे. अशातच भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे ११ लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे. तर भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे दिवंगत सचिव संकेत नेवशे आणि दिवंगत कार्यकर्ते ब्रिजेश जोशी यांच्या कुटुंबियांना लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

संकेतचा शेवटचा व्हिडिओ समोर

शनिवारी रात्री ‘भुलेश्वरचा राजा’ची आगमन मिरवणूक सुरु असताना गणेश मूर्तीचा तोल जाऊन पडल्याने मंडळाचा सचिव संकेत नेवशे तिच्याखाली दबला गेला होता. घटनास्थळावरील व्हिडिओ नंतर समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना समजलं की, शेवटच्या क्षणी संकेतने नेमके काय केले होते. त्याने त्या भव्य मूर्तीला दोन्ही हातांनी सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. हा व्हिडिओ पाहून नेवशे कुटुंबीयांसह मित्र मंडळीही भावूक झाली होती.

Maharashtra TimesAmravati Fire : बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? अमरावतीत अर्भकमृत्यू, बापाचा काळीज चिरणारा सवाल; आमचं लेकरु आहे तसं द्या, पोस्टमार्टम नको, कुटुंबांचा टाहो

गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवण्याची मोहीम

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील प्रमुख रस्ते, गणेश मंडळांकडे जाणारे व विसर्जन मिरवणुकीचे मार्ग आणि वर्दळीचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळण्याची घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

शहरातील माजीवडा, पाटलीपाडा, कल्याण फाटा, तीन हात नाका आणि कोपरी पूल परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सध्या सुरू आहेत. गणेशोत्सवकाळात शहरात नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती नगरअभियंता प्रशांत सोनग्रा यांनी दिली.

Maharashtra TimesPune News : सुट्टी काढली, पत्रिकाही छापल्या; पुण्यातील महिला पोलिसांचा समलिंगी विवाह रद्द, अचानक लागलेल्या ब्रेकमागील कारणांची चर्चाया मोहिमेत मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, गणेश मंडळांकडे जाणारे व विसर्जन मार्ग आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांवरील खड्डे प्राधान्याने बुजवण्यात येत आहेत. या कामाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा याचीही संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यांची नियमित पाहणी करून नव्याने आढळणारे खड्डे तातडीने बुजवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.