Bhandara Crime: शिक्षकी पेशाला कलंक लावणारी घटना भंडाऱ्यातील जिल्हा परिषद शाळेत घडली आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी त्या शिक्षकाला चांगलाच चोप दिला.

प्रकरण काय?
अनिल जगन राऊत (५४) असे शिक्षकाचे नाव असून, तो लाखांदूर येथील साईनाथ वसाहतीत वास्तव्यास आहे. पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकी शाळेत तो कार्यरत आहे. शाळेत रुजू झाल्यापासूनच तो इयत्ता तिसरी आणि चौथ्या वर्गातील मुलींशी आक्षेपार्ह चाळे करीत असे. मुलींना घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता. भीतीपोटी आजपर्यंत मुलींनी सदर बाब पालकांना सांगितली नव्हती. मात्र, सोमवारी, ९ मार्चला चिमुकल्यांना शिक्षकाचा हा त्रास सहन न झाल्याने शाळेतील खिचडी शिजविणाऱ्या महिलेकडे घडलेला प्रकार सांगितला. खिचडी शिकविणाऱ्या महिलेने घडलेला घृणास्पद प्रकार चिमुकल्यांच्या आई-वडिलांना सांगितला.
Chhatrapati Sambhajinagar Fire : धुळे-सोलापूर महामार्गावर हॉटेलवर जेवणासाठी थांबलेली प्रवाशांनी भरलेली बस आगीच्या भक्ष्यस्थानी
गावकऱ्यांकडून शिक्षकाला चोप
सदर प्रकार ऐकून सुन्न झालेल्या आई-वडिलांनी गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना घेऊन लगेच पोलिसपाटील यांच्या निदर्शनास सदर प्रकरण आणून दिले. गावकरी व पोलिस पाटलांनी मंगळवारी शाळेत जाऊन चौकशी केली असता शिक्षकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी शिक्षकाला चोप दिला . पोलिस पाटील यांनी लागलीच पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या घटनेमुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
Crime News: हॉटेलवरील घटना लपवण्याचा प्रयत्न फसला; 6 महिन्यांनी आचाऱ्याची बॉडी खड्ड्यातून बाहेर, बिंग फुटलं
यापूर्वी तीन वर्षांचा कारावास
सदर शिक्षकाने यापूर्वी लाखांदूर येथे कार्यरत असताना शाळेत एका १२ वर्षीय मुलीशी असेच चाळे केल्यामुळे २०१८मध्ये त्याने तीन वर्षे कारागृहात घालविल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांनी दिली. आरोपीला अटक करून बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

