Headlines

chandrapur political clash sushma andhare vs pratibha dhanorkar ; आमची नाकेबंदी करणाऱ्यांची लोकसभेत कोंडी करु! सुषमा अंधारेंचा चंद्रपुरातून थेट इशारा


Sushma Andhare On Pratibha Dhanorkar: आमची नाकेबंदी करणाऱ्यांची लोकसभेत कोंडी करु! असा नाव न घेता सुषमा अंधारेंनी धानोरकरांना इशारा दिला.

sushma andhare
सुषमा अंधारे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: चंद्रपूर महापालिका निवडणुकीत आमची वाट अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आगामी लोकसभा निवडणुकीत नाकेबंदी करू, असा इशारा शिवसेना (उबाठ)च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे नाव न घेता दिला.

चंद्रपुरात एका कार्यक्रमानिमित्ताने अंधारे आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापालिकेमध्ये शिवसेना (उबाठा)ने भाजपला पाठिंबा देत भाजपचा महापौर आणि शिवसेना (उबाठा) गटाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपद मिळविले. यावरून आता काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा)मध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगू लागला आहे.

Maharashtra TimesSatara ZP Election : साताऱ्यात पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश, भाजपला शेवटपर्यंत थांगपत्ता नव्हता, फडणवीसांची नाराजी
आम्हाला निष्ठा शिकवू नका
‘ज्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अनेकवेळा कात टाकली आणि जे आपल्या मूळ विचारांशी कधीच एकनिष्ठ राहू शकले नाहीत, त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवून नाकाबंदीच्या बाता मारू नयेत, अशा शब्दांत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अंधारे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रपूरविषयी अंधारे यांनी खासदार संजय राऊत यांना विचारावे म्हणजे त्यांना आरसा दिसले. वारंवार तोंडघशी पडल्यानंतर एखादे अपघाती यश मिळाले की इतके हुरळून जाऊ नये. अहंकाराची ही सूज लवकरच उतरेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस आजही सर्वात मोठा आणि वरचढ पक्ष आहे, हे विसरण्याची चूक करू नका, असेही खा. धानोरकर म्हणाल्या.

Maharashtra TimesAshok Kharat Case: खरातच्या ‘कुकर्मां’चा वाढता पाढा! नव्या तीन फिर्यादी, अत्याचाराचे 6 गुन्हे नोंद, कोर्टात आज सर्व खुलासे
वडेट्टीवारांविरुद्ध शंभर कोटींचा दावा
वाशीम : काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध वाशीम जिल्हा न्यायालयात शंभर कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. या खटल्यावर २० एप्रिलला सुनावणी होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर दावा न्यायालयाने स्वीकारला असून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असल्याचेही राजू पाटील राजे यांनी सांगितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा