Baramati News: सदर विमान खाली उतरत असताना रनवेवरून घसरल्याची माहिती समोर आली आहे.
बारामती विमानतळावर पुन्हा शिकाऊ विमानाचा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती : बारामती विमानतळावर आज दुपारी शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान खाली उतरत असताना रनवेवरून घसरल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे एक वाजता कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे विमान बारामती विमानतळावर उतरत होते. त्याचवेळी विमानाचा ताबा सुटून ते रनवेच्या बाहेर घसरले. विमानतळ परिसरातच ही घटना घडल्याने तातडीने संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच विमानतळाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विमानातील व्यक्ती सुरक्षित असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मात्र, विमान रनवेवरून घसरण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे बारामती विमानतळाच्या परिसरात काही काळ नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. बारामती विमानतळावर यापूर्वीही विमान दुर्घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर आज घडलेल्या या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनाही बारामती इथं झालेल्या विमान अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनं फक्त बारामतीच नव्हे तर संपूर्ण राज्य सुन्न झाले होते. या विमान दुर्घटनेची चौकशी पूर्ण झालेली नसतानाच अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज विमानतळावर घडलेल्या या दुर्घटनेप्रकरणी सखोल तपासानंतरच दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा