Headlines

Bank Holiday List 2026 ; बुधवारी शेअर मार्केट खुले राहणार की बंद? वर्षभराच्या सुट्ट्यांचे नियोजन एका क्लिकवर


देशात सण-उत्सवांचा हंगाम सुरू झाला आहे. 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद आहे. तर 28 तारखेला रक्षाबंधन आहे. हे दोन्ही दिवस हॉलिडे आहेत. परंतु, यांचा शेअर बाजारावर कितपट परिणाम असेल? या दिवशी शेअर बाजार बंद असतील की खुले असतील? असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांना पडले आहेत. 26 तारखेपासून ते वर्षाच्या शेवटापर्यंत शेअर बाजार बंद असणाऱ्या सर्व तारखा जाणून घ्या.

Share Market Holiday List 2026
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
देशात सण-उत्सवांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. अशामध्ये गुंतवणूकदारांच्या मनात विविध प्रश्न आहेत. 26 ऑगस्ट रोजी ईद आहे, त्यानंतर दोन दिवसांनी लगेच रक्षाबंधन आहे. त्यानंतर देशात सणांची जी सुरुवात होईल, ती वर्षाच्या शेवटापर्यंत सुरूच असेल. येत्या बुधवारी ईद-ए-मिलादचे सण आहे. सण-उत्सव म्हणजे देशातील बाजारपेठेत आणि विशेषकरून शेअर बाजारात मोठ्या हालचाली पाहायला मिळतात. त्यामुळे वर्षातला हा हंगाम गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनाने फार महत्वाचा असतो.

26 ऑगस्ट उद्यावर आहे. देशभरात ईद-ए-मिलादची सुट्टी असते. अशात शेअर बाजारात काय सुरू असेल? आणि काय बंद? असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. ईद-ए-मिलाद सणामुळे शेअर बाजार पूर्णपणे बंद राहणार नाही. गुंतवणूकदारांना नेहमी प्रमाणे खरेदी-विक्री करता येणार आहे. पण या दिवशी सेटलमेन्ट होणार नाही. एकंदरीत, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 26 ऑगस्ट रोजी एखादे शेअर्स खरेदी केले तर ते Demat खात्यात मिळवण्यासाठी गुंतवणूकदाराला एक दिवस थांबावे लागेल. म्हणजे गुंतवणूकदाराने 26 ऑगस्ट रोजी खरेदी केलेले शेअर्स 27 तारखेला Demat खात्यात येतील.

आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखादा शेअर्स 26 तारखेला विकला तर तर ती रक्कम मिळवण्यासाठी गुंतवणूकदाराला 27 ऑगस्टची वाट पहावी लागेल. फक्त 26 ऑगस्ट नव्हे तर 25 ऑगस्ट रोजी खरेदी तसेच विक्री केलेल्या शेअर्स 27 ऑगस्ट रोजीच सेटल होईल. एकंदरीत, 26 ऑगस्टरोजी एनएसई तसेच बीएसई खुली आहे. या दिवशी शेअर्स खरेदी-विक्री करता येईल परंतु सेटलमेन्ट होली डे असल्यामुळे खरेदी केलेले शेअर्स प्राप्त किंवा विक्री केलेले शेअर्सची रक्कम मिळवण्यासाठी एका दिवसाची वाट पहावी लागेल. या दिवशी करन्सी मार्केट पूर्णपणे बंद असेल. तर MCX पूर्णपणे खुले राहील.

28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे शेअर बाजरासंबंधित अनेक प्रश्न गुंतवणूकदारांना आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी शेअर बाजारावर काही विशेष परिणाम होणार नाही. सर्व कामकाज अगदी सुरळीत सुरू राहील.

Maharashtra Times8th Pay Commission Salary Hike: 2.57 पेक्षा कमी फिटमेंट फॅक्टर तरी सॅलरीत मोठी वाढ शक्य; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचे नवीन Calculationयेत्या काही दिवसांमधील शेअर बाजारतल्या सुट्ट्या

14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्यामुळे शेअर बाजार पूर्णपणे बंद राहील. त्याच प्रमाणे, 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्यामुळे शेअर बाजार पूर्णपणे बंद राहील. तसेच दसऱ्याच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार असून 10 नोव्हेंबर रोजी दिवाळी-बलिप्रतिपदा असल्यामुळे ट्रेडिंग बंद राहील. गुरु नानक जयंती तसेच नाताळाच्या दिवशी शेअर बाजार बंद राहील.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा