Headlines

Asaduddin Owaisi Slams BJP And Congress In Dhule Municipal Election Rally


असदुद्दीन ओवैसी यांची आज धुळ्यात प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजवर सडकून टीका केली. धुळ्यात एमआयएमच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यावी यासाठी फोन केला जात असल्याचा आरोप ओवैसी यांनी यावेळी आपल्या भाषणात केला.

Assaduddin Owaisi
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अजय गर्दे, धुळे : एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची आज शहरात प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यांनी मतदारांना एमआयएमच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं. “दोन तरुण मुले साडे पाच वर्षापासून तुरुंगात आहेत. हा कायदा बनवणारे लोक काँग्रेसवाले होते. काँग्रेसचा कोणी नेता स्वातंत्र्यानंतर कधी दोन ते पाच वर्ष तुरुंगात राहिला? मी लोकसभेत सांगितले होते. डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या सरकारने हा कायदा बनवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2019 मध्ये हा कायदा आणखी कडक केला. काँग्रेसने बनवलेले कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करत आहेत. अमित शाह यांनी जो कायदा आणला आम्ही त्याच्या विरोधात मतदान केलं”, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

“मी जर काँग्रेसवाल्यांविरोधात बोलायला सुरुवात केली तर हे मुकाबला नाही करू शकणार. 1962 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दंगे झाले. त्यावेळेच्या पीडितांना बांगलादेशमध्ये ढकललं गेलं. मुसलमान दिसला की त्याला बांगलादेशी म्हणतात. आज मोदी देखील काँग्रेसच्या पॉलिसीवर काम करत आहेत. मुंबईच्या रेल्वेत बॉम्बस्फोट झाला. या घटनेत 11 मुसलमानांना पकडले गेले. 19 वर्ष ते लोक तुरुंगात होते. त्यावेळेस कोणाचे सरकार होते? काँग्रेस सत्तेत होती”, अशी टीका ओवैसी यांनी केली.
Maharashtra TimesMumbai Local Train Fire : विद्याविहार ते कुर्ल्या दरम्यान लोकल ट्रेनच्या डब्ब्याला आग, CSMT ला जाणारी स्लो लोकल तात्पुरती बंद

‘तुमचा सत्तेतला बाप आला तरी…’, औवेसींची घणाघात

“हायकोर्टाने सांगितलं हे 11 लोक बेकसुर आहेत. त्यांचा काय गुन्हा होता? या अन्यायविरुद्ध तुम्हाला उभं राहावं लागेल. यासाठी तुम्हाला धुळ्यामध्ये धुळे महापालिकेत एमआयएमचे उमेदवारांना निवडून द्यावं लागेल. धुळ्यात एमआयएमचा उमेदवारांना फोन करून सांगितलं जात आहे. तुमचा सत्तेतला बाप जरी आला तरी एमआयएमचे उमेदवार मागे हटणार नाहीत”, असा घणाघात असदुद्दीन ओवैसी यांनी केला. “15 तारखेला एमआयएमच्या उमेदवारांसमोरचं बटन दाबा. भाजपवाले सांगतात मकर संक्रांतीला MIM च्या पतंगवर बंदी घाला. पण यावेळेस धुळ्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात 16 तारखेच्या निकालात पतंग उडताना दिसेल”, असा दावा ओवैसी यांनी केला.
Maharashtra TimesJalgaon News : भाजपची जळगावात सर्वात मोठी कारवाई, तब्बल 27 जणांची पक्षातून थेट हकालपट्टी
“वक्फ बोर्डाच्य जमिनींवर पण कारवाई सुरू आहे. हिंदू देवस्थान कमिटीमध्ये बाहेरचा कोणीही प्रतिनिधी बनू शकत नाही. मात्र वक्फ बोर्डाच्या कामिटीमध्ये नॉन मुस्लिम पण सदस्य बनू शकतो, असा कायदा बनवला. या कायद्यानंतर महाराष्ट्रामध्ये महापालिका निवडणूक होत आहेत. तुम्ही या निवडणुकांमध्ये सरकारच्या विरोधात मतदान करा. तुमचं अनमोल मतदान MIM च्या बटनला दाबून करा”, असं आवाहन ओवैसी यांनी केलं.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा