Headlines

Aravind Sanka Success Story; पहिलं स्टार्ट-अप फेल ठरलं तेव्हा वाटलं सगळं संपलं! एका ॲपची आयडिया ठरली सुपरहिट, उभारले 25000 कोटींचे साम्राज्य

Who is Aravind Sanka: एक छोटीशी कल्पनाला तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकते. एकेकाळी फ्लिपकार्टमध्ये नोकरी करणारे अरविंद संका यांनी शहरांमधील प्रवाशांच्या वाहतुकीच्या समस्यांचे समजली आणि शहरांमध्ये लोकांच्या प्रवासाची समस्या पाहून अरविंद यांना अशी कल्पना सुचली की आज 25000 कोटींच्या कंपनीचे मालक बनले आहेत.

Rapido Co-Founder Arvind Sanka Success Story
एका ॲपची आयडिया ठरली सुपरहिट, उभारले 25000 कोटींचे साम्राज्य
Aravind Sanka Success Story: एखादी कल्पना किंवा आयडिया कधी यशस्वी होईल याचा अंदाज लावता येत नाही… आणि हाच एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. अरविंद संका यांच्यासोबत असंच काही घडलं. एका साध्या ॲपपासून सुरुवात करून अरविंद यांनी आज 25000 कोटी रुपयांची कंपनी उभी केली. अरविंद यांनी अशा बाजारात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं जिथे आंतरराष्ट्रीय कंपन्यांनाही स्वतःला स्थापित करणे कठीण होते. अरविंद संका यांनी ओला आणि उबर यासारख्या दिग्गजांमध्ये आपला स्टार्टअप स्थापित करून घराघरात ओळख निर्माण केली.

अरविद सांका कोण?

अरविद सांका कोण?

अरविंद सांका यांचं नाव कदाचित तुम्हाला फारसं परिचित नसेल पण, त्यांनी सुरू केलेल्या ब्रँडबद्दल नक्कीच ऐकलं असेल. अरविंद सांका रॅपिडोचे सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. 2015 मध्ये बाईक टॅक्सी म्हणून सुरू झालेली रॅपिडोचे मूल्यांकन 25,000 कोटी रुपये झाले असून अरविंद संका यांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर या ब्रँडने यश मिळवले. पवन गुंटुपल्ली आणि एस. आर. ऋषिकेश या सहकाऱ्यांसोबत अरविंद यांनी भारताच्या वाहतूक व्यवस्थेतील अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित केले.

फ्लिपकार्टमधील अनुभव कामी आला

फ्लिपकार्टमधील अनुभव कामी आला

रॅपिडोच्या तीन संस्थापकांपकी अरविंद यांनी 2008 ते 2012 दरम्यान आयआयटी भुवनेश्वर येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. IIT मधील शिक्षणाआधी त्यांनी टाटा मोटर्समध्ये इंटर्नशिप केली आणि ऑटोमोटिव्ह उद्योगाची सखोल माहिती घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर अरविंद फ्लिपकार्टमध्ये रुजू झाले आणि सप्लाय चेन व लॉजिस्टिक्स विभागात काम केले. अशाप्रक्रारे, फ्लिपकार्टमधील अनुभवाचा वापर करून अरविंद यांनी नंतर रॅपिडोचे बिझनेस मॉडेल विकसित केले.

शहरी समस्यांमधून धडा घेतला

शहरी समस्यांमधून धडा घेतला

रॅपिडोच्या आधी अरविंद आणि त्यांच्या टीमने Karrier नावाचा लॉजिस्टिक्स स्टार्टअप सुरू केलेला ज्याचा उद्देश शहरांतर्गत डिलिव्हरीसाठी ग्राहकांना लहान मालवाहू कंपन्यांशी जोडण्याचा होता. मात्र, सांका यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसले तरीही अपयशाने खचून न जाता अरविंद आणि सहकाऱ्यांनी बाजाराचे बारकाईने विश्लेषण केले. यावेळी त्यांनी शहरी समस्यांवर लक्ष केंद्रित केले आणि शहरांमध्ये दररोज प्रवास करणाऱ्यांना भेडसावणारी मोठी समस्यालक्षात आली आणि त्यात संभाव्य व्यावसायिक संधी शोधली.

रॅपिडोचा प्रवास भारताच्या रस्त्यांसारखा खडतर

रॅपिडोचा प्रवास भारताच्या रस्त्यांसारखा खडतर

2015 मध्ये लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अत्यंत किफायतशीर दरात पोहोचवण्याचे लक्ष ठेवून रॅपिडो सुरू केली. पण, अनेक राज्यांमध्ये बाईक टॅक्सींबाबत अस्पष्ट धोरणांमुळे त्यांना सुरुवातीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. तरीही या आव्हानांना न जुमानता रॅपिडोने आपल्या नेटवर्कचा विस्तार सुरूच ठेवला. सध्या रॅपिडोने बाईक टॅक्सींसह वाहतुकीच्या इतर अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

कारऐवजी बाईक टॅक्सीवर फोकस

कारऐवजी बाईक टॅक्सीवर फोकस

रॅपिडोच्या लाँचवेळी ओला आणि उबरने आधीच भारतीय टॅक्सी बाजारपेठ पूर्णपणे काबीज केली. त्यामुळे रॅपिडोने या दोघांशी स्पर्धा करण्याऐवजी वेगळाच मार्ग निवडला आणि गाड्यांऐवजी बाईक टॅक्सींवर लक्ष केंद्रित केले. कमी भाडे आणि वाहतुकीतील प्रवासाचा कमी वेळ यामुळे रॅपिडो हळूहळू तरुणांमध्ये लोकप्रिय बनले. त्यानंतर कमी अंतराच्या प्रवासातील यशानंतर कंपनीने हळूहळू ऑटो-रिक्षा आणि चारचाकी टॅक्सी सेवांमध्ये विस्तार केला.

2,000 कोटींचा निधी उभारला

2,000 कोटींचा निधी उभारला

अलीकडेच रॅपिडोने नव्या फंडिंग फेरीत अंदाजे 2,000 कोटी उभारले आणि यासह कंपनीचे मूल्यांकन जवळपास 25,000 कोटींपर्यंत वाढले. गेल्या काही वर्षांतील या प्रभावी वाढीमुळे अरविंद संका भारतीय स्टार्टअप उद्योगातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी बनले.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा