Headlines

ITR Notice Verification ; आयकर विभागाकडून नोटीस आल्यास सर्वात आधी चेक करा, बनावट तर नाही ना? प्रत्येकासाठी आवश्यक अशी माहिती


ईमेल किंवा मेसेजच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक नोटिसीवर खात्री न करता विश्वास ठेवणे कधीकाळी आपल्याला महागातही पडू शकते. अनेकदा काही सायबर गुन्हेगार प्रतिष्ठित संस्थांच्या नावाचा वापर करून सायबर गुन्हे करण्यात पटाईत असतात. त्यामुळे जर तुम्हाला आयकर विभागाकडून कोणत्याही प्रकारची नोटीस आली तर आधी ती खरी आहे का? याची खात्री करून घ्यावी नंतरच पुढची प्रक्रिया करावी.

ITR Notice Verfication
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वाढत्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांना गुन्हे करण्याचे अनेक मार्ग मोकळे झाले आहेत. अगदी प्रतिष्ठित संस्थांची नावे वापरूनही गुन्हे करण्यात ही मंडळी पटाईत आहे. अशामध्ये खबरदारी घेऊन सामान्य जनतेने सावध राहणे गरजेचे झाले आहे. ITR दाखल करण्याची तारीख निघून गेली आहे, अशामध्ये करदात्यांना आयकर विभागाकडून नोटीशी येण्यास सुरुवात झाली आहे. याचा फायदा घेण्यासाठी काही सायबर गुन्हेगार मंडळींनी त्यांच्या विकृती कामांना सुरुवात नक्कीच केली असेल. त्यामुळे आता प्रत्येक करदात्याने सतर्क राहण्याची गरज आहे.

तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीशी आल्या तर ती खरंच आयकर विभागाकडून आली आहे का? याची स्पष्टता करून घेणे ही प्रयेक करदात्याच्या जबाबदारी आहे. जर याची खात्री केली नाही तर तुमच्या खात्यातून मोठी रक्कम लंपास होण्यास वेळही लागणार नाही किंवा भविष्यात तुमच्या नावाचा गैरवापरही होऊ शकतो. जर या सायबर क्राईमच्या सापळ्यात अडकायचे नसेल तर जरी आयकर विभागाच्या नावाने नोटीस आली असेल तरी त्यावर पूर्णपणे विश्वास न ठेवता आधी नोटिशीची खात्री करून घ्या.

नोटीस खरी की एक सापळा? कसे ओळखावे?

जर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस आल्याचा इमेल किंवा मेसेज आला असेल तर त्या नोटिशीची खात्री करण्यासाठी दोन पद्धती आहेत. करदात्याला त्याच्या PAN Number च्या माध्यमातूनही नोटिशीची स्पष्टता मिळवता येऊ शकते तर नोटिशीवर पुरवण्यात आलेल्या DIN Number च्या माध्यमातूनही नोटिशीची स्पष्टता मिळवता येते.

  • PAN Number च्या माध्यमातून करा नोटिशीची खात्री

सर्वात आधी ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन ‘Order Issued By ITD’ येथे क्लिक करा. तेथे तुमचा पॅन नंबर, डॉक्युमेंटचे प्रकार, नोटीस जाहीर होण्याची तारीख आणि मोबाईल क्रमांकाची पुष्टी करा. योग्य OTP टाका. समोर तुमच्या नोटिशीसंदर्भात संपूर्ण माहिती येईल.

  • DIN Number च्या माध्यमातून करा नोटिशीची खात्री

जर तुमच्या नोटिशीमध्ये DIN Number आहे. तर ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन ‘DIN And Mobile Number‘ या पर्यायाची निवड करावी. आलेला OTP टाकण्यात यावा, समोर नोटिशीसंदर्भात माहिती येऊन जाईल.

Maharashtra TimesOvertime Rule: कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइमसाठी दुप्पट पगाराची तरतूद, पण प्रत्यक्षात मिळणार की कागदावरच राहणार? सरकारने स्पष्ट सांगितले‘या’ महत्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात.

जर एखाद्या करदात्याला ITR विषयी कोणतीही माहिती मिळवायची असल्यास इतर कोणत्या संकेतस्थळाचा वापर करण्यापेक्षा ई-फायलिंग पोर्टलचाच उपयोग करावा. OTP मिळवण्यासाठी कोणताही उपलब्ध मोबाईल क्रमांक चालू शकतो. आलेल्या नोटिशीवर DIN क्रमांक आहे का? ते तपासा. DIN क्रमांक असल्यास त्याची पुष्टी करून घ्या. नोटीस वैध असल्यासच मागण्यात आलेली माहिती पुरवण्यात यावी अन्यथा नोटिशीत देण्यात आलेल्या सध्या लिंकवरही क्लिक करणे टाळणेच योग्य.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा