Headlines

Another blow to fda tukaram mundhe in mumbai high court over thane soft drinks case; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कोर्टात पुन्हा अडचण; कंपनीचा कोट्यवधींचा साठा जप्त, पण बाजू मांडताना वकिलांची भंबेरी


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: कारवाई करताना नियमपालन केले नसल्याबद्दल पाच लाखांच्या दंडाचा फटका बसलेल्या ‘एफडीए’ला मंगळवारीही मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात फटकारले. अधिकाऱ्यांकडून नियमांप्रमाणे कारवाई होत नसल्याबद्दल प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

उत्पादनाचे ‘मिसब्रँडिंग’ केल्याच्या कारणाखाली ‘जेएनटीएल कन्झ्युमर हेल्थ प्रा. लि.’ कंपनीचा ठाण्यातील २.२४ कोटी रुपयांचा शीतपेयांचा साठा ‘एफडीए’ने तपासणीनंतर जप्त केला. त्याला कंपनीने ॲड. हर्ष गुरसहानी यांच्यामार्फत याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. ‘एफडीएने २ व ३ जून रोजी आमचा शीतपेयांचा साठा जप्त केल्यानंतर आम्ही वारंवार अर्ज करूनही अन्न विश्लेषण अहवाल देण्यात आला नाही. जप्त केलेल्या पॅकबंद पेयांची ठरावीक शेल्फ लाइफ आहे. परिणामी आमचे खूप मोठे, भरून न निघणारे नुकसान होत आहे’, असे कंपनीने ज्येष्ठ वकील डॉ. बिरेंद्र सराफ यांच्यामार्फत मांडले. मात्र एफडीएच्या वकिलांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही.

‘चूल मटण’चा परवाना निलंबित

स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोहगाव येथील ‘हॉटेल चूल मटण’चा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला. नियमांचे पालन होईपर्यंत हॉटेल सुरू न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन्न पदार्थांबरोबरच गुटखा विक्रीवरही ‘एफडीए’ने कारवाई केली. विभागात १४ ते १७ ऑगस्टदरम्यान पुणे विभागात कारवाई करून १० लाख सात हजार ४६० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तीन प्रकरणांमध्ये पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून सात जणांना अटक करण्यात आली. दोन आस्थापना बंद करण्यात आल्या असून, सात लाख रुपये किमतीचे एक वाहनही जप्त करण्यात आले.

ब्लिंकिटच्या सातारा, हर्सूल परिसरातील आस्थापनांचा अन्न परवाना निलंबित

छत्रपती संभाजीनगर शहरातील मेसर्स ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड (ब्लिंकिट) या ऑनलाईन अन्न साठवणूक व वितरण करणाऱ्या कंपनीच्या सातारा व हर्सूल परिसर अशा दोन आस्थापनांचा एफएसएसएआय अन्न परवाना मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला आहे. विभागाच्या तपासणीत अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि कायदेशीर नियमांचे उल्लंघन झाल्याचे विभागाने म्हटले आहे.

सातारा परिसर, हायकोर्ट कॉलनी येथील आस्थापनेची वर्षा रोडे, कीर्तिका झाडे यांच्या पथकाने तपासणी केली. दरम्यान, आवारातून अन्नपदार्थांची ऑनलाइन डिलिव्हरी केली जाते, त्याच ठिकाणाहून सिगारेटची विक्री केली जात असल्याचे आढळले. अन्नपदार्थ विक्रीच्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास सक्त मनाई आहे. शीतसाखळीचे उल्लंघन आढळले. तसेच कालावधी संपलेल्या अन्नाची साठवण यासह कोल्ड स्टोरेजमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकाच रॅकवर एकत्र साठवले होते. अन्नपदार्थ आणि स्वच्छता साहित्याची एकाच कप्प्यात साठवणूक केली होती. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. कर्मचारी ॲप्रन, हँड ग्लोव्हज आणि हेड कॅप न वापरता अन्नपदार्थ हाताळत असल्याचे दिसून आले. यासह कायदेशीर कागदपत्रांचा अभाव असल्याचे दिसून आल्याचे विभागाने म्हटले आहे. हर्सूल परिसरातील मेसर्स ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड अस्थापनेची तपासणी फरिद सिद्दीकी यांनी केली. तेथे अस्वच्छता व शौचालयाची चुकीची जागा, शीतसाखळीचे उल्लंघन व नोंदींचा अभाव, पायाभूत सुविधांमधील त्रुटी, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे सादर केली नाहीत आणि कामगार ॲप्रन, हेडगिअर किंवा हँड ग्लोव्हज न वापरताच अन्नपदार्थ हाताळत होते, परवाना व पाण्याचे अहवाल नसणे, खरेदी बिलांचा अभाव असल्याचे विभागाने निवेदनात म्हटले आहे. आदेशानुसार, निलंबन कालावधीत ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडला किंवा त्यांच्या वतीने कोणालाही या आवारातून कोणत्याही अन्नपदार्थाची खरेदी, विक्री, साठवणूक किंवा ब्लिंकिट ॲपद्वारे ऑनलाइन डिलिव्हरी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही विभागाने म्हटले आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत