Headlines

Amravati News: भुताटकी नव्हे, ‘मास हिस्टेरिया’! डोमा आश्रमशाळेतील विद्यार्थिनींमधील विचित्र लक्षणं तणावामुळे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्कर्ष – melghat doma ashram school ghost rumour reason revealed medical officer conclude mass hyseria in female student


Melghat Ashram School: मेळघाटसारख्या दुर्गम भागात अशा घटना घडल्यास त्याभोवती अंधश्रद्धेचे वलय निर्माण होण्याची मोठी शक्यता असते. डोमातही असा प्रकार घडला.

Anderson Phillip Catch - 2026-08-14T082439
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा, अमरावती: मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा शासकीय निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनींमध्ये अचानक दिसून आलेली विचित्र लक्षणे हा भुताटकीचा प्रकार नसून ‘मास हिस्टेरिया’ असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक नायडू यांनी स्पष्ट केले आहे. वैद्यकीय निकषानुसार एकाच वेळी निर्माण होणारा ताणतणाव या परिस्थितीस कारणीभूत ठरतो. आता या वैद्यकीय शिक्कामोर्तबामुळे आश्रमशाळेतून ६०८ विद्यार्थ्यांनी अचानक घेतलेला काढता पाय आणि विद्यार्थिनींच्या मनातील धास्ती निर्माण होण्यामागे आश्रमशाळेतील दैनंदिन व्यवस्थापन आणि भौतिक सुविधांची अपूर्णता कारणीभूत ठरल्याचे चित्र समोर येत आहे.

मास हिस्टेरिया ही मानसिक अवस्था असली तरी, हा ताणतणाव सहजासहजी निर्माण होत नाही. एकाच ठिकाणी अनेक विद्यार्थिनींना रडणे, हसणे, ओरडणे, शांत राहणे किंवा प्रतिसाद न देणे अशी लक्षणे जाणवली असतील, तर त्यामागे सामूहिक तणावाची शक्यता वैद्यकीय अधिकारी व्यक्त करतात. त्यामुळे डोमा आश्रमशाळेत ‘नेमके काय झाले?’ यापेक्षा ‘असा तणाव निर्माण होण्यामागे कोणते घटक होते?’ याचा शोध आता अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

Maharashtra TimesGadchiroli News : साखरझोपेत असताना आक्रित घडलं, तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने करुण अंत; कुटुंबीयांचा आक्रोशआश्रमशाळेतील अपुऱ्या खोल्या, एकाच ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा वावर, आहारातील अनियमितता व गुणवत्ता तसेच स्वच्छतेचा अभाव यासारख्या बाबी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम घडवून आणतात. घरापासून दूर राहणाऱ्या लहान बालकांना जेव्हा सातत्याने गुदमरल्यासारख्या वातावरणाचा सामना करावा लागतो, तेव्हा असा सामूहिक मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता अधिक बळावते. डोमा येथील घटनेतही याच घटकांची पार्श्वभूमी लाभल्याचे संकेत प्रशासकीय सूत्रांकडून मिळत आहेत. विद्यार्थ्यांसाठी नियमित समुपदेशन व आनंददायी वातावरणाचा अभाव, परिसर आणि व्यक्तिगत स्वच्छतेबाबत सातत्यपूर्ण मार्गदर्शनाची वानवा हीसुद्धा या गंभीर प्रकारामागील प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे. पहिली घटना घडल्यानंतर तत्काळ उपाययोजना न झाल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थिनींमध्ये भीती वाढल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांकडून काढला जात आहे.

अशाप्रसंगी केवळ वैद्यकीय उपचारापुरते मर्यादित न राहता, आश्रमशाळांमध्ये मोकळे, तणावमुक्त, सुरक्षित आणि बालस्नेही वातावरण तयार करणे हे आव्हान ठरत आहे.

Maharashtra TimesGadchiroli News: आश्रमशाळांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’; सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींनी जीव गमावल्यानंतर आदिवासी विकास मंत्री उईकेंची घोषणा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आदिवासी विकास विभागाच्या मुख्य आयुक्त लीना बनसोड यांनी डोमासह जारिदा व सलोना आश्रमशाळांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या भागात केंद्रीय स्वयंपाकगृह सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असून, घडल्या प्रकाराची चौकशी करून योग्य त्या कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना का राबविल्या जात नाहीत, असा सवाल शिक्षण व सामाजिक वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

मेळघाटात व्यापक प्रबोधनाची गरज
डोमा आश्रमशाळेतील प्रकार हा एका शाळेपुरता मर्यादित नसून मेळघाटात याबाबत व्यापक जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित करतो. या घटनेची दखल घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी जादूटोणाविरोधी समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी, तसेच समाजकल्याण विभागाचे सहसंचालक यांच्याशी तातडीने पत्रवार्ता करून विशेष उपक्रम हाती घेतला जाईल, असे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अॅड. गणेश हलकारे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा