Amravati Melghat Ranigaon Ghat Pickup Accident Five People Died; चालकाचं अचानक नियंत्रण सुटलं, वाहन 70 फूट खोल दरीत कोसळलं, मेळघाटात भीषण अपघात; पाच जणांचा जागीच अंत
Amravati Melghat Ranigaon Ghat Pickup Accident Five People Died; चालकाचं अचानक नियंत्रण सुटलं, वाहन 70 फूट खोल दरीत कोसळलं, मेळघाटात भीषण अपघात; पाच जणांचा जागीच अंत
Amravati Accident : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. राणीगाव घाटामध्ये पिकअप वाहन पलटी झाल्यानं चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अमरावती अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमरावती : अमरावती जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मेळघाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. राणीगाव घाटामध्ये पिकअप वाहन पलटी झाल्याने पाच जणांचा जागीच करुण अंत झाला आहे. तर 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं वाहन मागच्या बाजूला असलेल्या 60 ते 70 फूट खोल दरीत कोसळल्यानं हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन मागील बाजूला असलेल्या 60 ते 70 फूट खोल दरीत कोसळले. धारणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत धारणी पोलीस स्टेशनपासून 35 किलोमीटर अंतरावर राणीगावकडे जाताना शिवाझरी ते राणीगाव दरम्यान बोलेरो पिकअप वाहनाच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण अचानक सुटलं. त्यानंतर वाहन मागच्या बाजूच्या 60 ते 70 फूट खोल दरीत कोसळले. वाहनात कंजोली आणि राणीगाव येथील 15 ते 20 लोक होते. यापैकी घटनास्थळावरच पाच जणांचा मृत्यू झाला असून 10 ते 12 व्यक्ती जखमी आहेत. सर्व मृतक कंजोली ता. धारणी येथील आहेत. हे लोक बाजाराकरिता देडतलाई मध्यप्रदेश येथे गेले होते. सर्व मृतदेह आणि जखमी उपचारांकरिता धारणी येथे रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, वाहनचालक फरार झालेला आहे. Jay Patil : मित्रांसोबत बीचवर जातोय, जयने सकाळी केलेला फोन, लाटेत वाहून गेल्याने बेपत्ता; बहीण-आईपासून पाटील कुटुंबाने सत्य लपवलं
तक्रारीनुसार, 26 मे 2025 रोजी रहाटगाव येथील हॉटेलमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गेट-टुगेदर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत चेतन आणि आकाश हे दोघेही सहभागी झाले होते. चेतनने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील विद्यार्थिनीला पार्टीसाठी बोलावले. पार्टीदरम्यान तिच्या पेयात गुंगीचे औषध मिसळण्यात आले. पेय घेतल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर हॉटेलमधील एका खोलीत चेतन अंबाडकर याने तिच्यावर अत्याचार केल्याचे आरोप आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा